✍️अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी दि 31 जुलै:- बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्यां जयंती निमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही बाईक रॅली मायबाई वार्ड कसबा आर्वी येथुन आर्वी शहरातील मुख्य मार्गाने तसेच आर्वी शहरातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आर्वी तहसील कार्यालय व नगरपालिका कार्यालयात साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिवीर लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समिती व सकल मातंग समाज यांच्या उपस्थितीत बाईक रॅली चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली.
उद्या दि. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. तरी सर्व समाज बांधवांनी बंधु आणि भगिनी दुपारी 4 वाजता मायबाई वार्ड कसबा येथे उपस्थित राहावे हि विनंती साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे समिती आर्वी संकल मातंग समाज आर्वी च्या वतीने करण्यात आली आहे.