डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पिंपरी चिंचवड ता.१:- मोका पॅटर्न, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. शहरातील २४ गुन्हेगार टोळीतील २२६ जणांवर कारवाई केल्याने पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांनी आता धक्का घेतला आहे. सोमवारी आणखी ०३ गुन्हेगारी टोळीवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
त्यात पिंपरीतील यशवंत डोंगरे, तळेगाव दाभाडे येथील सुधीर परदेशी आणि भोसरी येथील सौरभ मोतीरावे अशी मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या गुन्हेगार टोळ्यांची नावे आहेत. पिंपरी टोळीप्रमुख १) यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे वय २२ वर्ष २) सुशांत उर्फ दगडी अण्णा अनिल जाधव वय १९ वर्ष ३)आकाश रंजन कदम वय २१ वर्ष ४)शुभम कैलास हजारे वय २५ वर्षे ५) सुशांत उर्फ भैय्या आजीनाथ लष्करे वय २२ वर्षे ६)मयूर प्रकाश परब वय २२ वर्षे ७)कृष्णा धोंडीराम शिंदे वय २५ वर्ष ८) अजिंक्य अरुण टाकळकर वय २१ वर्ष या टोळीवर गंभीर स्वरूपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत. तळेगाव दाभाडे टोळी प्रमुख १) सुधीर अनिल परदेशी वय २५ वर्ष रा. केशवनगर वडगाव मावळ २) विवेक नंदकिशोर लाहोटी वैभवी ४२ वर्ष रा. शाहूनगर चिंचवड ३) प्रतीक्षा विक्रांत भोईर वय २९ वर्ष, रा, केशवनगर ,वडगाव मावळ ४)शरद मुरलीधर साळवी वय ३० वर्ष, रा. काळेवाडी) आणि भाऊ, अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत या टोळींवर ०६गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
भोसरी टोळीप्रमुख १)सौरभ संतुराव मोतीरावे (वय २० वर्षे रा.आळंदी २)आकाश गोविंद शर्मा वय २२ वर्ष रा.भोसरी ३) राम सुनील पुजारी वय २० वर्षे रा. मोशी ४)ओंकार मल्हारी दळवी रा.दिघी )अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत या टोळीवर ०९गुन्हे दाखल आहेत .त्यामधील ०६ गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक सुहास खाडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकय्या कारभारी, अनिल गायकवाड, ओमकार बंड, दताजी कौठकर, सागर शिंदे, विनोद वीर, मच्छिंद्र बांबळे, संदीप जोशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

