मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट/पुणे:- येथे ऑल महाराष्ट्र क्रेडिट अँड ज्युनिअर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 पठाडे स्टेडियम खराटे पुणे या राज्यस्तरीय स्पर्धेत हिंगणघाट येथील सेंट जॉन विद्यालयाचे विद्यार्थाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ४२ वजन गटात सुवर्ण पदक पटकावले.
पुणे येथे दिनांक २८ जुलै ते ३० जुलै ला वाको इंडिया द्वारा ऑल महाराष्ट्र क्रेडिट अँड ज्युनिअर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप पठाडे स्टेडियम खराटे पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमित देवडे याने ४२ वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त करून हिंगणघाट शहराचे व शाळेचे नाव लोकिक केले.
किक बॉक्सिंग हा खेळ पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, फुल कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक आणि म्युङिाकल फॉर्म या अशा विविध प्रकारात खेळता जातो. दिनांक २८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध शहरातील अनेक खेळाडु सहभागी झाले होते. यात अमित देवडे याने ४२ वजन गटात सुवर्ण पदक पटकाविले आहेत. त्यामुळे त्यांची आता रांची झारखंड येथे होणारी राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा करिता निवड झाली. सगळ्यांनी अमित देवडे याने सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केलं.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348(7385445348

