मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- मेडपल्ली साजा अंतर्गत येत असलेल्या सकीनगट्टा येथील नामे पोचा वंगा तलांडी, दामा कारे गावडे, रमेश पंजा आत्राम यांच्या स्वतःच्या मालकीचे बैल व गाई दि. 26 जुलै 2023 ला जंगलात चराई साठी गेले असता सकाळी 7.30 वाजता पारलू चुकू तलांडी यांच्या शेतात मोहाच्या झाडाखाली अचानक वीज पडून सदर बैल व गाई ठार झाले असता मालकानी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली होती.
त्यामुळे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबांना सदर नुकसान ग्रस्त लाभार्त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली असता. यावेळी तहसीलदार साहेबांनी संबधीत महसूल कर्मचाऱ्यांना अहवाल मागून नुकसानग्रस्त लाभार्त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून दिले असल्याने सदर लाभार्त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.

