मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जि. प. उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाट, जि. प. प्रा. शाळा सुलतानपूर, स्नेहदीप इंग्लिश मीडियम स्कूल हिंगणघाट या तीनही शाळेमध्ये स्कार्फ डे चे आयोजन. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून वृक्षारोपणामध्ये फळझाडे व फुलझाडांची लागवड, स्वच्छता शिक्षणामध्ये प्लास्टिक निर्मूलना करिता बॉटल ब्रिक्स तयार करण्याचे मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
१ ऑगस्ट हा दिवस जागतिक स्काउटिंग सूर्वोदय दिवस व जागतिक स्कार्फ दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. स्काउटिंग शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकासामध्ये कुठलाही भेदभाव न करता सर्वांगीण विकास कसा होईल हा प्रयत्न केला जातो. हा दिवस स्कार्फ परिधान करून साजरा केला जातो व या अवचित्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत राणी लक्ष्मीबाई युनिट, फ्लॉक लीडर संगीता पेठे द्वारा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर व स्नेहदीप इंग्लिश मीडियम स्कूल हिंगणघाट येथे स्कार्फ डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाट चे केंद्रप्रमुख यशवंत आटे सर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी कार्य तत्पर राहणे किती गरजेचे आहे, हे स्वानुभवातून सांगितले.
यावेळी फ्लॉक लीडर संगीता पेठे यांनी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. ज्यामध्ये आंब्याची झाडे, फुलझाडे व औषधी वनस्पती लावण्यात आली. स्वच्छता साक्षरतेचे बीज मुलांमध्ये रुजविण्याकरिता, पर्यावरणाची हानी करणारा प्लास्टिक हा घटक कमी व्हावा म्हणून प्लास्टिक ब्रिक्स तयार करणे, याविषयी मार्गदर्शन केले.
तीनही शाळेमध्ये कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सन्माननीय डॉ. मंगेश घोगरे, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा, शिक्षणाधिकारी प्राथमिक, श्रीमती अल्का सोनवाणे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, श्रीमती वैशाली अवथळे, जिल्हा संघटक, वर्धा भारत स्काऊट गाईड वर्धा, श्री. अशोक कोडापे वि.अ.शि, श्री. सुभाष टाकळे, वि.शि.अ, श्री. अरविंद राठोड वि.शि.अ यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाटचे मुख्याध्यापक श्री पुष्पराज झिलटे, श्री प्रमोद बोरकर (विषय शिक्षक), रागीट मॅडम, आस्कर मॅडम यांचे परिश्रम व सहकार्य लाभले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथील स्कार्फ डे साजरा करण्याकरिता व विविध खेळ आणि स्पर्धाचे आयोजन करण्यामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी वासनिक व मयुरी देशमुख यांचे परिश्रम व सहकार्य लाभले. स्नेहदीप इंग्लिश मीडियम स्कूल हिंगणघाट येथील कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मुख्याध्यापिका रूपाली सरोदे व त्यांच्या शिक्षकांचे परिश्रम व सहकारी लाभले. देशाच्या संरक्षणामध्ये सैन्याची जशी महत्त्वाची भूमिका असते तसेच देशांतर्गत छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्याकरिता कब, बुलबुल, स्काऊट, गाईड आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडून खारुताईचा वाटा उचलू शकतात. हा संदेश विद्यार्थी मनात पेरण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे केल्या गेले.