अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण :- खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार कु. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या संकल्पनेतून श्री सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्राथमिक शाळा भाल येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मोठेभाल गावचे पोलीस पाटील गणेश काशिनाथ म्हात्रे, रमेश म्हात्रे, चंद्रकांत काशिनाथ म्हात्रे, मोठेभाल सुभाष जगन्नाथ म्हात्रे, राजा आप्पा म्हात्रे तसेच शाळेचे मुख्याध्यापक मंगेश म्हात्रे, अलंकार ठाकूर सर, स्कूल कमिटी सदस्य आदि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान वतीने संपूर्ण जिल्हात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348