‘व्हाॅईस ऑफ मीडिया’च सोडवू शकते पत्रकारांच्या समस्या : विनोद बोरे
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर.4 ऑगस्ट:- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हा विधिमंडळ, संसद, विधानसभा, कार्यकारी मंडळ, अधिकारी वर्ग, न्यायपालिका यावर लक्ष ठेवून देश हा घटनेनुसार बरोबर चालत आहे कां यावर सतत लक्ष ठेवून रहातो. सोबत जनतेच्या ईतरही समस्या मांडून तो त्याला न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य करतो. परंतू ही निस्वार्थ सेवा करतांना त्याचे मात्र स्वतःच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होते आणि असे झालेही आहे. त्यामुळे पत्रकारांना शसनाकडून मासीक आर्थीक साहय्यतेची गरज आहे. परंतू आज पत्रकारांच्याच या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने व्हाईस ऑफ मीडियाने हा मुद्दा उचलून धरल्याने 4 दिवसाअगोर विधान परिषदेत पत्रकारांचा मुद्दा गाजला, येणाऱ्या काही दिवसात पत्रकारांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या सोडवण्याची ताकत व्हाॅईस ऑफ मीडिया मध्ये असून व्हाॅईस ऑफ मीडियाच पत्रकारांच्या समस्या सोडवू शकते असे मत व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केले.
यावेळी मंचावर ॲड.चंद्रशेखर बरेठीया (माजी अध्यक्ष तालुका बार असोसिएशन सावनेर तथा विधीतज्ञ), ॲड.अरविंद लोधी (माजी नगराध्यक्ष सावनेर), ॲड.प्रा.गुजाजी बरडे, आनंद आंबेकर (नागपूर जिल्हाध्यक्ष व्हाॅईस ऑफ मीडिया) नेमिनाथ जैन (प्रदेश कार्याध्यक्ष व्हाॅईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग) देवनाथ गंडाटे (जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया विंग) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी साप्ताहिक पत्रकार व संपादक यांच्या हस्ते मान्यवरांचा शॅाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आयोजक पांडुरंग भोंगाडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित पत्रकारांच्या पत्नींचा व महिलांचा सत्कार करण्यात आला सर्वांना पुस्तके भेंट देण्यात आली. कार्यक्रमाअंती पत्रकारांना व्हाॅईस ऑफ मीडिया तर्फे नियुक्ती पत्र व ओळख पत्र देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन निता इंगोले, प्रास्ताविक पांडुरंग भोंगाडे (जिल्हाध्यक्ष नागपूर, साप्ताहिक विंग) यांनी तर आभार कपील वानखडे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348