निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कवठाळा:-अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही उत्तम कापुस प्रकल्प तसेच जिल्हा परिषद शाळा नांदगांव व ग्रापंचायत नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापुस प्रकल्प चे (पी यू 51 चे मॅनेजर) सिद्धेश्वर जम्पलवर हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वातावरणात होत असलेला बदल याविषयी मार्गदर्शन केले. वाढते तापमान, तसेच जंगलाचा होत असलेला नाश त्यामुळे पाण्याचा दुष्काळ, यामुळे शेतीचे नुकसान यावर उपाय एकच ते म्हणजे वृक्षारोपण करने व निसर्गाचा समतोल राखणे.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यर्थ्यांन सोबत वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे वाचवा चे नारे देऊन जनजागृती करण्यात आली. नुसते झाडे लावायची नाही तर ती वाचवायची सुद्धा. यावेळी नांदगाव येथे 500 झाडे देण्यात आली व काही झाडे नांदगाव येथील प्रथम नागरिक विजयभाऊ निखाडे, शाळेचे मुख्याध्यापक धिवसे सर, सौ. लोखंडे मॅडम यांच्या उपस्थितीत लावण्यात आली.
यावेळी महिला बचतगट, ग्राम संघ, ग्रामपंचायत चे सहकारी , ग्रामसेवक राठोड सर, अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापुस प्रकल्प चे प्रदीप बोबडे , साईनाथ पिंपळशेंडे, सुचिता खडसे , महिला सक्षमीकरण मधुन ताई खेडवतकर, पशुसखी कल्पना मडावी, कविता पडाल, मायाताई चौधरी (CRP) उपसथित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445340