पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- काल दि. ०३/०८/२०२३ रोजी रात्री ०८:३० वा चे सुमारास इफ्रा पान शॉप स.नं. ६३, ए.आर.वी. रॉयल सोसायटी, हांडेवाडी रोड, पुणे येथे तक्रारदार महंमद नौशाद मुजफ्फर हुसैन हे पानटपरीवर असताना आरोपी नामे १) अमर विठ्ठल देशमाने, वय २३ वर्षे, रा. फ्लैट नं १०४ शेवाले कॉम्प्लेक्स, मयुर पार्क, हांडेवाडी चौक, पुणे व २) गणेश गौतम कोरडे, वय २२ वर्षे, रा. कुंजीर वाडी, म्हातोबाची आळंदी, शितोळे वस्ती मागे, हडपसर पुणे. ३) साहिल व त्यांच्या एका अनोळखी इसमाने पैशाची मागणी केली फिर्यादाने त्यांना नकार दिला असता त्यांच्या कडील धारधार हत्याराची भिती दाखून फिर्यादीस हाताने मारहाण केली. व गल्ल्यीतील अंदाजे १,५००/- रू रोख रक्कम बळजबरी काढून घेवून पळून जावू लागले फिर्यादींनी आरडा ओरडा केला असता आरोपी अमर विठ्ठल देशमाने याने त्याच्याकडील धारधार हत्यार दाखवुन धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकाराबाबत उड्री बीट मार्शल कर्तव्यावर असणारे पोअं ४८०२ लक्ष्मण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जमलेल्या लोकांच्या मदतीने १ ) अमर विठ्ठल देशमाने, व २) गणेश गौतम कोरडे यांना धाडसाने ताब्यात घेतले. लागलीच फिर्यादींची कोंढवा पोलीस ठाणेस तक्रार नोंद करुन दाखल गुन्ह्यामध्ये वरील दोन्ही आरोपी यांना तात्काळ अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध चालु आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गणेश तोरगल हे करत आहे.