पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३१/०७/२०२३ रोजी ११.५५ वा. नियंत्रण कक्ष ११२ व्दारे पिंपरी पोलीस ठाणेस कॉल प्राप्त झाला की, कॉलर नामे गुणाजी यशवंत रोकडे, वय ७५ वर्ष, रा. कमल निवास बिल्डींग, प्रभातनगर, सृष्टी चौक, पिंपळेगुरव, पुणे यांची सासू नामे शालूबाई रूपा साळवी, वय ८५ वर्षे, रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी, पुणे या घरात मरून पडल्या आहेत. लवकरात लवकर मदत पाठवावी, असा कॉल प्राप्त झाल्याने पिंपरी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे ठिकाणी जावून पाहणी करून बेशुद्ध महिलेस वायसीएम हॉस्पीटल येथे रवाना करता, त्या मयत असल्याचे घोषित केल्यानंतर सदर मयताची कायदेशिर पुर्तता करून सदरबाबत पिंपरी पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते.
दिनांक ०५/०८/२०२३ रोजी वरील घटनेच्या अनुषंगाने फिर्यादी नामे श्रीमती सुनीता भिमराव कांबळे, वय ४८ वर्षे, धंदा नोकरी, रा. फ्लॅट नं. ०२, चंद्ररंग पार्क, पिंपळे गुरव, पुणे यांनी मयताचे दागिन्यांची व घरातल्या वस्तूंची खात्री करून फिर्याद दिली की, दिनांक ३०/०७/२०२३ रोजी २२.३० वा. ते दिनांक ३१/०७/२०२३ रोजी १०.३० वा. चे दरम्यान सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ पिंपरी, पुणे येथे फिर्यादी यांची आजी नामे शालूबाई रूपा साळवी, वय ८० वर्षे, रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी, पुणे या एकट्याच राहणेस असल्याचा फायदा घेवून, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचे सिमेंटचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून मयत शालूबाई रूपा साळवी यांना कोणत्यातरी कठीण वस्तूने डोक्यात मारून जीवे ठार करून मयताचे अंगावरील व घरात असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट व गॅस सिलेंडर असा एकूण १,०४,५००/- रू. किं.चा माल जबरीने चोरून नेला आहे. अशी फिर्यादी दिल्याने पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रं. ८२८/२०२३ भादंवि कलम ३०२, ३९२, ४५७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व दाखल गुन्ह्याचा तपास श्री. दिपक डॉब, सहा. पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
दाखल गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, मा. पोलीस सह आयुक्त सो मा. अपर पोलीस आयुक्त सो, मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- १ व मा. सहायक पोलीस आयुक्त सो पिंपरी विभाग यांचे सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. सावडे, पोलीस उप निरीक्षक श्री. जिनेडी व पोलीस अंमलदार यांची दोन तपास पथके तयार करून तपासास सुरवात करण्यात आली. दोन ही पथकामध्ये नेमण्यात आलेल्या अंमलदार यांनी मयत इसमाचे नातेवाईक व राहते वस्तीतील लोकांकडे चौकशी करून माहिती काढून तपास करीत असताना, सदर तपासा दरम्यान घटना घडलेले ठिकाण हे मिश्रवस्तीत असून त्या भागात राहणारे, तसेच जबरी चोरी व इतर चोरी करणारे गुन्हेगार व विधी संघर्षित बालक यांची माहिती घेवून त्यांचे हालचाली बाबत पडताळणी करीत असताना, पिंपरी पोलीस ठाणे रेकॉर्डवरील व त्याच भागात राहणारा एक विधी संघर्षित बालक हा घटना घडल्यापासून त्या भागात दिसून येत नसल्याची माहिती प्राप्त झाली. सदर विधी संघर्षित बालकाची माहिती घेत असताना तो सतत राहती ठिकाणेही बदलत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर विधी संघर्षित बालकाचा पारंपारिक पद्धतीने पाठपुरावा करीत असताना, तो आज दिनांक ०७/०८/२०२३ रोजी पिंपरी भाजी मंडईच्या आवारात लपत- छपत फिरत असल्याचे दिसून आले व त्यास ताब्यात घेण्यासाठी जाताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर विधी संघर्षित बालकास ताब्यात घेवून वरील नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने कसोशिने व विश्वासात घेवून तपास करत असताना, त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून दाखल गुन्हा हा त्याने त्याची पत्नी जेलमध्ये असून तीचा जामीन करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने मयताचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पैसे मिळवण्यासाठी गुन्हा केल्याचे तपासात सांगितले असून, सदर विधी संघर्षित बालकाकडून दाखल गुन्ह्यात जबरीने चोरलेल्या मालापैकी काही सोन्याचे दागिने, मयताचा मोबाईल हैंडसेट व गॅस सिलेंडर असा एकूण ३०,४००/- रू. किं.चा माल दोन पंचांसमक्ष हस्तगत करण्यात आला असून वरील प्रमाणे गंभीर व क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा उत्कृष्ठ रित्या तपास करून उघडकीस आणण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त सो पिंपरी चिंचवड, मा.श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड, मा.श्री. विवेक पाटील पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- १ पिंपरी चिंचवड, मा. श्री. सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त सो पिंपरी विभाग पिंपरी चिंचवड, श्री. राम राजमाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्रीमती रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. अनिरूध्द सावर्डे, शाकिर जिनेडी, पो.हवा, राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, अविनाश कदम, वसंत बेदरकर, पो.ना. जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, विष्णू भारती, ओंकार बंड, जावेद मुजावर, मपोना भाग्यश्री जमदाडे, पो.शि. मोहसिन शेख, विजय जानराव, रोहित वाघमारे, विकास रेड्डी, समीर ढवळे, आनंद बजबळकर व दत्ताजी कवठेकर यांनी केली आहे.

