साकोली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन साकोली:- वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे भेल प्रकल्प सुरू करावा या मागणी करता तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून भेल प्रकल्प बंद असून आमच्या भंडारा जिल्ह्यात बेकारांची फौज निर्माण झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांची आपली जमीन भेल प्रकल्पाकरता विकत दिलेली आहे त्यांना पण असे वाटत होते की आमच्या घरचे मुलं भेल मध्ये लागतील परंतू त्यांचें पण पैसे पण संपले व शेतकरी सुद्धा बेकार झाले म्हणून त्यांनी जागा दिली परंतु असं काही झालं नाही वाढती लोकसंख्या व बेरोजगारी लक्षात घेता तो भंडारा जिल्ह्यात असा कोणता प्रकारचा मोठा प्रकल्प नसून कोणत्याही परिस्थितीत भेल प्रकल्प सुरू झाला पाहिजे भंडारा जिल्ह्यात आन-बान शान असलेला एकमेव भेल प्रकल्प आहे दिवसेंदिवेश बेरोजगार ची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे भेल प्रकल्प सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे हे प्रकल्प सुरू झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असाही इशारा देण्यात आलेल्या आहे.
यावेळी निवेदन देताना भंडारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका महिला सचिव शितल नागदेवे, यादोराव गणवीर, तालुका शहर महिला अध्यक्ष स्वर्णमाला गजभिये, गणेश गजभिये, केवळराम उके, एस ए नंदेश्वर, देवीका गणवीर, यादवराव गणवीर, संजय मेश्राम , उत्तमा गडपायले, कमला रंगारी, धनंजय रामटेके, येस्वत उपरिकर व इतर बहुसंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348