संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने तिच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली.
आज तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप जवळ आली आहे. त्यामुळे अनेक धोकादायक घटना पण समोर येत आहे. अशीच एक खळबळजनक घटना नागपुर येथून समोरआली आहे. येथे एका इंस्टाग्राम वरील मित्राने’ 17 वर्षीय मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओळत. तिला लग्नापूर्वी हनिमून करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती अल्पवयीन मुलगी 3 महिन्यांची गर्भवती झाली.
यावेळी मुलीच पोट वाढत होत त्यात तब्येत बिघडली आईने तिला डॉक्टरकडे घेऊन गेली त्यामुळे डॉक्टरने तिला तपासले असता ती तर गर्भवती असल्याचे दिसून आले. हे आयकताच कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळे तिच्या इंस्टाग्राम मित्राच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला. यानंतर या अत्याचार बाबत नंदनवन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी तरुण अभिषेक कमलाकर डोंगरे वय 19 वर्ष रा. सद्भावनानगर, नंदनवन याला अटक केली.
आरोपी अभिषेक डोंगरे हा एका खासगी रुग्णालयात नोकरी करतो. ऑक्टोबर 2022 मध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडियावर वरून अभिषेकने पिढीत मुलीला मॅसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. अभिषेकने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला आपल्या घरी बोलावून लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासले असता मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी मुलीला याबाबत विचारणा केली असता तिने अभिषेक बाबत सांगितले. नंदनवन पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिषेकला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.