✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सेलू पोलिसांची धडक कारवाई करून गावठी दारूची भठी उद्ध्वस्त केला. दारू गाळणाऱ्या व्यक्तीकडून चक्क नाल्यातील पाण्याचा वापर केला जात होता. मौजाआर्वी लहान शेतशिवारातील नाल्याच्या काठावर रवींद्र कळमकर (रा. सुकळी स्टेशन) हा प्रवीण थूल याच्या गावठी मोहा दारूच्या हातभट्टीसाठी कच्चा मोह रसायन सडवा तयार करीतअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ जाऊन पाहणी केली असता. आरोपी रवींद्र श्यामराव कळमकर (रा. सुकळी स्टेशन) हा गावठी मोहा दारूसाठी कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी करून दहा प्लास्टिकच्या ड्रममधील कच्चा मोहा रसायन सडवा आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
शिवाय सेलू पोलिस ठाण्यात रवींद्र श्यामराव कळमकर व प्रवीण आत्माराम थूल याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.