मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वृत्तवाहिनीने धडाडीचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आली, लोकशाही चा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारितेवर हा हल्ला म्हणजे पत्रकारितेचे मुस्कटदाबी आहे.
पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती.
संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार /पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगरपालिके समोर ज्या चौकात येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली गेली, महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.
सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी आ. किशोर पाटील आणि त्यांच्या हल्लेखोर समर्थकांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही सिरोंचा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांनी तहसीलदार सिकतोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या निवेदन देण्यात आली आहे.
निवेदन देतांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटन सिरोंचा तालुका अध्यक्ष – सागर मूलकला, सचिव – सत्यम गोरा, पत्रकार – श्याम बेज्जनिवार, शंकर जिमडे, अशोक कुम्मरी,सुधाकर सिडम, जलील शेख यांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

