मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथील आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ओबीसी आघाडी सेल अध्यक्ष संतोष कोटकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यांनतर शहरातील प्रमुखमार्गाने तिरंगा रॅली काढून भारत माता की जय… वंदेमातरम…. स्वतंत्र दिन चिरायू हो.. घोषणा परिसरातील वातावरण देशभक्ती ने भारावून गेले होते. ही रॅली रेड्डी गोडाऊन मार्गे ते इंदिरा गांधी चौक ते शिवाजी महाविद्यालय ते जन कार्यालय कॅम्प एरिया पर्यंत काढण्यात आले जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करून समारोप करण्यात आले.
त्यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे, संजय जीवतोडे, दिवाकर साखरे, शहर प्रमुख नामदेव पोले, धनंजय कुसराम, मीनाक्षी खरवडे, सोनल ननावरे,हेमराज हस्ते,चोखाजी ढवले, ऍड हेमराज मेश्राम, स्वप्निल सूर्यवंशी, राकेश जुमनाके, स्वप्निल जुमनाके, डॉ. सुरेश गेडाम, प्रभाकर वाकडे, अनुरथ निलेकर, पत्रूजी घोडमारे, भगवान चापले, रामदास गवारे, विश्वनाथ राजनहिरे, अनिल बाळेकरमकर, महेश बोरकर, सुधीर मेश्राम, गंगाधर ताटलवार, साईनाथ कन्नके, खुशाल मालेलवार आदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

