अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -15 ऑगस्ट:- सावनेर इंडियन मेडीकल असोसिएशन येथे आयएमचे अध्यक्ष डॉ.आशिष चांडक यांचा हस्ते सकाळी १० वा.ध्वजारोहण करण्यात आले. नंतर लगेच आयएमए परिसरात बहुतांश सदस्यांनी “मेरी मटी मेरा देश”अंतर्गत वृक्षारोपन केले करून “मेरी माती मेरा देश”च्या सेल्फी पॉईंटवर फोटोग्राफिक आठवणी गोळा केल्या.
यावेळी डॉ.चांडक यांनी सगळ्यांना स्वतंत्रता दिनाचा शुभेच्छा देत देशाला स्वतंत्र करण्याकरिता ज्या वीर पुरुषांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले यांना नमन करून त्यांचा बलिदानाने देशाला स्वतंत्र मिळाले त्या आठवणी ताज्या करून स्वतंत्रता दिवसाचे महत्व पटवून दिले.आपल्या देशाच्या सीमेवर आपल्या रक्षणाकरिता तैनात असलेल्या जवानांचे अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त केले. ध्वजारोहनानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने आयएमचे सदस्य डॉ.विलास मानकर उपाध्यक्ष, डॉ.परेश झोपे उपाध्यक्ष, डॉ.प्रवीण चव्हाण कोषाध्यक्ष,डॉ अमित बाहेती सहसचिव, डॉ.विजय धोटे, डॉ.विजय घटे, डॉ.चंद्रकांत मानकर, डॉ.अशोक जैसवाल, डॉ.अशोक देशमुख, डॉ.ज्योत्सना धोटे, डॉ संगीता जैन, डॉ.प्राची भगत, डॉ.रेणुका चांडक, डॉ.निलेश कुंभारे, डॉ.जिवतोडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ.नरेंद्र डोमके, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. सचिन घटे, डॉ. जयंत कडसकर, डॉ. मयूर डोंगरे, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. गौरी मानकर, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ.कंचन डोमके, डॉ.अंकिता बाहेती, डॉ. पूजा जिवतोड़े, डॉ.रश्मी भगत, डॉ श्वेता चव्हाण, डॉ.स्वाती पुण्यानी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएमए चे सचिव डॉ.शिवम पुण्यानी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348