अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी मो.7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- पेण तालुक्यात गट ग्रामपंचायत वढाव येथे ०९ ऑगस्ट ते क्रांतिदिनी पंचप्रण शपथ घेऊन १३ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवून येथिल आर्मी, पोलीस व नेव्ही मधील काम करून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शाल, श्रीफळ आणि प्रशस्ती पत्र देऊन ग्रुप ग्राम पंचायत वढाव सरपंचा याचे हस्ते गौरण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद बा. ही म्हात्रे यांनी स्वीकारले. त्याप्रसंगी बालविद्याविकास शाळेचे अध्यक्ष अधिक पाटील व सर्व सभासद गट ग्राम पंचायत वढावचे उपसरपंच ओमकार म्हात्रे, आजी तंटामुक्ती सदस्य विलास म्हात्रे सदस्य व ग्रुप ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348