पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार नामे पवन तानाजी चव्हाण, वय ३०, धंदा नोकरी, रा. माउली सदन, फलॅट नं. १२५, ए/१, झेड कॉर्नर मांजरी रोड, बु, ता. हवेली, जि. पुणे हे काम करीत असलेले सिनेप्स लैब्स प्रा. लिमीटेड कंपनी खराडी पुणे मध्ये ठेवलेले भारतीय व परकीय चलनाचे असे मिळून ३,०७,४९२.१२ रुपये दि. ०७/०८/२०१३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याचे अनुषंगाने तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३७२/२०२२ भादंविक ४५४.४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, राजेंद्र लांडगे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर तपास पथक प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अमलदार विकास कदम, सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला असता, आरोपी नामे फुरकान नईम खान, वय २१, रा. शिवा पोस्ट फ्लोरा, गरक फॅक्टरी, रुम नं. ४५, ता, अलीशा, सेक्टर २९, जिल्हा पानिपत, राज्य हरियाना हा निष्पन्न झाला. त्याचा शोध घेत असताना, तो दि. १२/०८/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड येथे मिळून आल्यास त्यास ताब्यात पंचून २२.०० वा अटक करुन त्याला पोलीस खाक्या दाखवून त्याचेकडे तपास केला असता, ज्याने दाखल गुन्हयाचे चोरी बरोबरच सॅमसंग स्टोअर, मोर मॉलजवळ, खराडी पुणे येथे देखील रात्रीची परफोडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे व तो चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३५५/२०२३. भाविक ४५७,३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने दोन्ही ठिकाणावरुन चोरी केलेल्या भारतीय व परकीय चलानातील रक्कमपैकी काही रक्कम त्यांचे ताव्यातून जप्त करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो श्री रितेश कुमार पुणे शहर, मा.सहा. पोलीस आयुक्त सो श्री संदिप कर्णीक, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त सो परि. ४ श्री. शशिकात चोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग- श्री. संजय पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर.. श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस अंमलदार सचिन कूटे, अचिनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.