✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे यासाठी १५ आगस्ट स्वतंत्र दिनी जय लहू बॅड असोसिएशन संघटना कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे देवुन बॅड वाजवून शासनाचे लक्ष वेधले यामध्ये सहभागी प्रामुख्याने राजु खडसे, पवन खंदार, पांडु मुंगले, बंडू डोंगरे, विठ्ठल डोंगरे, दामु खडसे, संभा मुंगले, अनिकेत वानखेडे, रमेश मुंगले, दुरुप निखाडे, भीमराव शेंडे, राजू बोरखे, रवी पोटफोटे, सदाशिव खंडारे, विठ्ठल बावणे, संदीप बावणे व शासकीय महाविद्यालयाचे रुपेश लाजुरकर, संदेश मुन, शाम एडपवार, सुरेंद्र टेबुर्ने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी लहुजी शक्ती संघटना व वणा नदी संवर्धन समिती च्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, याच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन नियोजित शासकीय वैद्यकीय हे हिंगणघाट शहरामध्ये व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यात नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची मान्यता शासनाच्या वतीने मिळाली आहे. हे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या हिंगणघाट येथे होणे अत्यंत महत्त्वाचे असून नॅशनल हायवे ४४ व लोहमार्ग असून सर्वात मोठे तहसील हिंगणघाट हे आहे. हिंगणघाट शहराचा कितीतरी कालखंडापासून कोणत्याही प्रकारे मोठे कॉलेज नसल्याने हा परिसर मागासलेला असून येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून हा परिसर समृद्ध होईल. शहराच्या वाढत्या लोक संख्येमुळे दिवसेंदिवस रुग्णसेवेच्या सोयी अपुऱ्या पडत आहे. गोर गरीब तसेच गरजू नागरीकांना विशेषतः गरीब गरोदर मातांना अत्याधूनिक आरोग्य सेवा अती आवश्यक आहे. अतिविशिष्ट उपचारांअभावी गरीब तसेच ग्रामीण भागातील मातांचा अनेकदा मृत्यू होत असतो.
आमच्या संपुर्ण समाज बांधवांकडून, तसेच माता भगिनींकडून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. याची दखल घ्यावी.निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर मुंगले, अनिल डोंगरे, रवी निखाडे, विठ्ठल डोंगरे, मंगेश पोटफोटे, विशाल घाडुर्ले इत्यादी ने निवेदन दिले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348