पत्रकारांना न्याय देण्यात अपयशी ठरत असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत जाळून केला संताप व्यक्त .
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -17 ऑगस्ट :- सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले व कुचकामी ठरत असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी मलिक विराणी तहसीलदार सावनेर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, सचिव लक्ष्मीकांत दिवटे, कार्याध्यक्ष दीपक कटारे, उपाध्यक्ष अनंता पडाळ आदींच्या नेतृत्वाखाली तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
17 ऑगस्ट ला महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या सुमारे 11 संघटना आप आपल्या स्तरावर पत्रकार बांधवांना न्याय मिळवून देण्याकरिता अहोरात्र झटत आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी पाहीजे तशी होत नाही. कायद्याच्या अंतर्गत खटल्यातील दोषींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.पत्रकार संरक्षण कायद्यान्वये लवकरात लवकर न्यायालयात खटले दाखल करून, मारहाण, जीवघेणे हल्ले, धमकावणे, शिवीगाळ आदी प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.आणि तो आपला जीव धोक्यात घालून समाजाकरिता आरश्याप्रमाणे काम करतो.राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, समाजकंटक आणि ज्यांच्या विरोधात बातम्या छापल्या जातात त्या लोकांच्या नजरेत ते पत्रकाराला शत्रू म्हणून पाहिले जाते आणी ते आपल्या प्रभावाचा त्यांना धाक दाखवत अनेक वेळा त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही होतात. त्यामुळे पत्रकार बंधू व त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला. 8 नोव्हेंबर 2019 अपयशी ठरत आहे. गेल्या 4 वर्षात विविध शहरांमध्ये सुमारे 200 पत्रकारांवर झालेले हल्ले हे त्याचे बोलके उदाहरण आहे. यापैकी अनेक घटनांमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल न झाल्यामुळे या कायद्याचा धाक समाजकंटकात दिसुन येत नाही.
नुकतेच पाचोरा येथील एका पत्रकाराला स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली असून, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत आमदार व त्यांच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल न केल्याने महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधव आपल्या सुरक्षेबाबत प्रचंड संतापले आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार बांधव आज निषेध नोंदवत आहे असे मत यावेळी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार मलिक विराणी यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयाच्या आवारात कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतिकात्मक प्रती जाळून पत्रकार बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केला. याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तेजसिंग सावजी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे विनोद वासाडे, प्रा. योगेश पाटील, पियुष झिंजुवाडिया, मधुकर रोकडे, किशोर गणवीर, मुकेश झारबडे, श्याम चव्हाण, रितेश पाटील, शांताराम ढोके, वैभव ढवळे, चंद्रमणी सोमकुवार आदी पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजनाचे संचालन सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव लक्ष्मीकांत दिवटे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष दीपक कटारे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348