संदीप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- खाजगी बसेस लापरवाई आणि नियमित सुरू असलेले अपघात त्यामुळे अनेक प्रवाश्याचे जीव गेले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस म्हणजे सुरक्षित प्रवास असे ब्रीद वाक्य असलेले एसटी आता नवीन अवतारात दिसून येणार आहे.
खाजगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) नें कंबर कसली आहे. राज्यातील पहिली स्लीपर (शयनयान) बसची निर्मिती दापोडी मध्यवर्ती कार्य शाळेत पूर्ण झाली आहे. एकूण 50 बसेस काही दिवसात तयार होणार आहेत. त्यापासून नागपूर विभागाला 4 बसेस मिळणार असून नागपूर पुणे ही बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीचा प्रवास आता एसटी बस मध्ये झोपून करता येईल.
एसटी महामंडळाने लांब पल्ल्यासाठी खास स्लीपर बसची निर्मिती केली आहे. नागपूर- पुणे हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर इंदोर, शेगाव, आदीलाबाद आंबेजोगाई आधी लांब पल्ल्याच्या गाड्या चालतात. नागपूर पुणे ही सर्वात व्यस्त चालणारी बस आहे. या मार्गावरील शिवशाही धावते. नागपूर वरून पुण्याला जाण्याची संख्या मोठी आहे. वेळेवर रेल्वेचे तिकीट आरक्षित होत नसल्याने प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. खाजगीच्या तुलनेत एसटीचे तिकीट स्वस्त असल्यास प्रवासी आता एसटीकडे वढतील असा विश्वास महामंडळाला आहे.
भाडे बाराशे रुपये राहण्याची शक्यता: या स्लीपर (शयनयान) बसचे भाडे बाराशे रुपये पर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही गाडी विना वातानुकुलीतही असणार आहे. हैदराबाद मार्गावरील धावणार ! सुरुवातीला नागपूर पुण्याकरिता चार स्लीपर बसची मागणी महामंडळाच्या नागपूर विभागाने मुख्यालयाला पत्रातून केली आहे. येत्या महिन्याभरात चार गाड्या विभागात दाखल होतील. असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर हैदराबाद सह इतरही लांब पडल्यावर या गाड्या चालविल्या जातील.
स्लीपर (शयनयान) बसची वैशिष्ट्ये: एकूण ३० प्रवासी झोपून प्रवास करू शकतात. गाडीला हवेच्या अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनामिक आकार. बारा मीटर लांब, २.६ मीटर रुंद आणि ३.६ मीटर उंच. एल डी मार्ग फलक, रेव्हसिंग कॅमेरा. लगेच करता दोन सामान कक्ष. आपत्कालीन दरवाजा, खिडकी तोडण्यासाठी पुरेसे हातोडे. अनाउन्सिंग सिस्टीम, मोबाईल चार्जर सुविधा, ते ठेवण्यासाठी पाऊच. पुश बॅक सीट, प्रत्येक मध्ये वाचण्यासाठी रीडिंग नाईट लॅम्प. स्लीपर एसटी बसचा आरामदाय प्रवास असणार आहे. याचे भाडे निम्मे शिवशाही पेक्षा कमी राहील. लवकरच नागपूर विभागाला चार गाड्या मिळतील ची माहिती श्रीकांत गबने उपमहाव्यवस्थापक नागपूर व अमरावती विभाग (एस टी महामंडळ)

