अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मोर्शी:- साहीत्यरत्न अन्नाभाऊ साठे यांचे जयंती निमीत्ताने बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्शी विधानसभा मतदारसंघ युनिटच्या वतीने दादारावजी उईके, प्रदेश महासचिव (पूर्व) बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश व विजयभाऊ वानखेडे, अध्यक्ष मोर्शी यांचे नेतृत्वाखाली सन्मान रॅली व संविधान बचाव, देश बचाव अभियान संपूर्ण मोर्शी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आयोजीत केले होते
बहुजन समाज पक्षाच्या वतीने मोर्शीत सन्मान रॅली व संविधान बचाव, देश बचाव गांव चलो अभियाना अंतर्गत 17 ऑगस्ट ला रॅली काढण्यात आली. बहादा येथे दादारावजी उईके, प्रदेश महासचिव बसपा महा.प्रदेश (पूर्व), यांचे अध्यक्षतेखाली व हर्षदजी शेळके, विनोदी सोनूले महासचिव बहुजन समाज पार्टी मोर्शी विधानसभा मतदारसंघ यांचे प्रमुख उपस्थितीत बहुजन समाज पार्टीची सभा झाली. यावेळी बहादा येथे बसपा ला मजबुत करणे करीता आव्हान केले. प्रसंगी सतीश कुमरे, शंकरराव धुर्वे, दिनेश काटे सह परिसरातील शेकडो बंधू भगिनी उपस्थीत होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348