अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्तान कार्याध्यक्ष तसेच पेण नगरपरिषद माजी नगरसेवक श्री.समीर सुभाष म्हात्रे तसेच पेण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष शिशिरदादा धारकर तसेच मिहीर धारकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आज सोमवार दि 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समन्वय शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी रायगडचे माजी खासदार अनंत गीते, शिवसेना पदाधिकारी व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
आज रायगड जिल्हातील अनेक नागरिक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यवर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पेण तालुकात शिवसेनेला अच्छे दीन आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असे सांगण्यात आले की आज जो तुम्ही प्रवेश केला आहात तो लढवय्यानच्या सेवेमध्ये प्रवेश केला आहात. लवकरच पेण मध्ये सभा होईल आणि तेव्हा सर्व शिवसैनिकाना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप 9766445348/7385445348