मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळा:- तालुक्यातील माळवाडी येथे नागपंचमी व श्रावण मास निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी यां ठिकाणी “माझी शाळा, माझी वसुंधरा” ही संकल्पना राबवत दक्ष स्वयंसेवक फौंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने वृक्षारोपण व वंचित बहुजन मुले – मुली यांना वही व पेन वाटप करण्यात आले.
गोरगरीब घरातील मुले मुली हे शिक्षणापासून वंचित राहू नये सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा. या मुलांसाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. काम केले तर एक दिवस जगू पण शिक्षण घेतले तर आयुष्यभर जगू वृक्षारोपण करताना पिपाडा, सिसो, सीताफळ, आवळा, कडुनिंब, करंजी अशा विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. वृक्षारोपण करणे जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे हे समजावून सांगितले.तसेच येणाऱ्या काळात गरीब मुलांना दक्ष स्वयंसेवक फौंडेशन मदत करेन असे अश्वासन दिले.
यावेळी उपस्थित जि.प.प्राथमिक शाळा माळवाडी मुख्यध्यापक सौ. शोभा रामजी आहेर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विठ्ठल ठोंबरे पाटील, उपाध्यक्ष श्री.ऍड अमोल रंजाळे, श्री.अमोल लेंडे, श्री.ऍड अजय मूर्तडक, दिपक शेळके, शिक्षिका सौ.मनिषा पोपटराव रौदंळ, शिक्षक श्री. अशोक शिवाजी अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348