✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहीद चंद्रशेखर कोरे यांच्या तेराव्या स्मृतिदिना निमित्त श्रद्धांजलीचा कार्यक्रम स्थानिक रा. सू.बिडकर महाविद्यालयामध्ये प्यारामिलिटरी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहीद चंद्रशेखर कोरे हा महाविद्यालयाचा शिक्षक प्रिय तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून आणि एनसीसीचा छात्र होता याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एन. के. सिंह सीआरपीएफ नागपूर विभाग प्रमुख हे होते त्यांनी सीआरपीएफ मध्ये काम करणे किती कठीण असते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात शहीद चंद्रशेखर कोरे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. शहीद चंद्रशेखर कोरे याच्या आई आणि वडील यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्यारामिलिटरी च्या सर्व कार्यकर्त्यानि अथक परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाच्या एनसीसी चे अधिकारी डॉ. रमेश भगत आणि त्यांचे कॅडेट्स यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संचालन श्री. बेग यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

