मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं.9420751809
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील अहेरी तालुक्यातील अनेक गावे आज विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षीत पण आज येथील नागरिक मूलभूत प्रश्नासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे राजाराम आणि परिसरातील नागरिकांनी माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते दीपक दादा आत्राम गावातील विविध समस्या बाबत निवेदन दिले.
या निवेदनाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते दीपक दादा आत्राम विनंती करण्यात आली, राजाराम परिसरातील विविध समस्याबाबत आपण शासन आणि प्रशासन दरबारी या समस्या अधिक जोमाने मांडून या भागातील समस्या निराकरण करण्याच्या प्रयन्त कराल अशी विनंती करण्यात आली. यावेळी निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या.
1)राजाराम येथील प्राथमिक आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावे, व रुग्णवाहिका उपलब्ध करून रिक्त पदे भरण्यात यावे: राजाराम परिसरात जवळपास 8 ते 9 गावे असून या ठिकाणी पक्के रस्ते नाहीत आणि 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात जावे लागतो. कमलापूर येथे आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी रुग्णवाहिका आहे, परंतु वेळेवर उपलब्ध होत नसून त्यामुळे अनेक रुग्णाचा वाटेतच जिव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमलापूर ते कोरेपल्ली किमान 20 ते 25 किमीचा प्रवास करावा लागतो.
2)राजाराम येथे राष्टीयकृत बँकेची स्थापन करण्यात यावे : राजाराम हे मध्येस्थी गाव असून जवळपास एकही बँक नाही, बँकेत जायचं म्हटलं तर अहेरी किव्हा आलापल्ली 30 ते 35 किमीचा प्रवास करून जावे लागतो. त्यामुळे बैंक कामासाठी संपूर्ण दिवस वाया जातो. तसेच, मानसिक, शारीरिक नाहक त्रास भोगावा लागत असतो. या परिसरात राजाराम, खांदला, पतीगाव, कोतागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली, कोंकापल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम, नंदीगाव, सूर्यपल्ली, छल्लेवाडा, ताटीगुडम, कोडसेलगुडम, कमलापूर, कोरेपल्ली, कवटाराम इत्यादी गावे असून जवळपास एकही राष्ट्रीयकृत बँक नसून श्रावणबाळ, निराधार, बँकेच्या व्यवहारासाठी खूप मोठी अडचण होत असते.
3) राजाराम ग्रामपंचायत कार्यालय असून या ठिकाणी स्वतंत्र ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी. 4) राजाराम येते तलाठी कार्यालय नसून साजा मध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात यावे. राजाराम येते स्वतंत्र तलाठी कार्यालय ते भाड्याचा खोलीत असून त्या ठिकाणी अपुरी जागा असल्यामुळे उन्हाळा, पावसाळ्यात नाहक त्रास होत असून राजाराम साजा मध्ये राजाराम, खांदला, पतीगाव, कोतागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली कोंकापल्ली, सूर्यापल्ली, रायगट्टा गोलाकर्जी इत्यादी गावे असून कुठेही जागा उपलब्ध करून तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात यावी.
4)शासनाच्या धोरणेनुसार गाव तिथे प्रवाशी निवारा उभारण्यात यावे.
राजाराम परिसरात प्रवाशी निवारा नसल्याने सूर्यापल्ली, राजाराम रायगट्टा गोलाकर्जी येते प्रवाशी निवारा नसल्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात झाडाचा आसरा घ्यावा लागतो.
5)राजाराम परिसरात कमी धाबाचा विद्युत पुरवठा होत असून ए. बी. केबल लावण्यात ग्रामपंचायत कार्यालय परवानगी देण्यात यावी व नवीन पोल लावण्यात यावी.
राजाराम परिसरात नेहमीच विजेची लपंडाव होत असून या भागात दर 5 व 10 मिनिटीनी या लाईट तड्यात, मड्यात होत असते. पावसाड्याचे दिवस असल्यामुळे साप, विंचू चा प्रमाण जास्त असतो. चावा घेऊन दगावणाचा शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणचा लाईनमेन नागेपल्ली ला राहत असून आपल्या मनमानी नुसार येत असतात. गावात तातपुर्ता एका व्यक्तीला पैसे देऊन लाईन सुरळीत केले जातो. लाईनमेन मुख्यालयी राहुन सेवा देण्यात यावी.
6)अहेरी आगारातील संपूर्ण बस अहेरी, राजाराम, कमलापूर मार्ग सिरोंचा कडे तसेच सिरोंचा रेपणपल्ली, कमलापूर, राजाराम मार्गे टाकण्यात यावे: रेपणपल्ली ते गोलाकर्जी 12 किमीचा प्रवास असून मध्यस्थी एकही गावे नसून रेपणपल्ली, कमलापूर, कोडसेलगुडम, ताटीगुडम, छल्लेवाडा विस्ताराणे खूप मोठा गाव असून या भागातील नागरिक याच मार्गाने जात असतात आणि राजाराम परिसरात सात ते आठ गावे असून शासकीय किव्हा अन्य कुठलेही कामानिमित्त अहेरी, गडचिरोली किव्हा चंद्रपूर ला जायला सोविस्कर होईल आणि प्रवासाना नाहकत्रास सुद्धा होणार नाही.
7)राजाराम परिसरातील विविध शाखेतील कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी: राजाराम परिसरात जिल्हा परिषद शाळा, भगवंतराव अनुदानित आश्रम शाळा असून बोटावर मोजण्या इतके शिक्षकवृद्ध यांनी मुख्यालयी राहत असून उर्वरित शिक्षक अहेरी, किव्हा आलापली, नागेपल्ली राहत असून यांचे मनमानीनुसार शाळेत येत असतात. विद्यार्थ्यावर होणारा शैक्षणिक परिणाम व अपघाताचे परिणाम लक्षात घेऊन शिक्षकाना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे करावे. तसेच आरोग्य सेवक, ग्रामसेवक, पटवारी, लाईनमेन, वनकर्मचाऱ्यांरी, आंगणवाडी सेविका, कृषी साह्ययक, विविध विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी. अन्यता भत्ता कपात करण्यात यावा.
यावेळी निवेदनकर्ता सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले सह माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कंबागौनीवार, माजी ग्रामपंचायत सरपंच शकुंतला कुडमेथे, माजी ग्रामपंचायत सरपंच ज्योतीताई जुमनाके, पोलीस पाटील सत्यम भंडारवार, व्येकय्या कडारवार, माहेश्वरी बात्तूलवार, रमेश पोरतेट, सामाजिक कार्यकर्ते माधव कुडमेथे, तंटामुक्त अध्यक्ष मुत्ता पोरतेट, रामशंकर अंबिलपवार, बील्पवार नारायण चिटकला, शंकर कोलावार, संतोष मोहुर्ले, संपत चिटकला, राजु मोहुर्ले, छाया तलांडे, महेश जाकेवार, राजेश दुर्गे, विलास दुर्गे साईनाथ दुर्गे, उमाजी शेगावकर आदी निवेदनकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348/9766445348

