हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मुलांमधील क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी व रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर द्वारा दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2023 ला क्रीडा संकुल विसापूर (बल्लारपूर) येथे आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
ही स्पर्धा रमा गर्ग सहाय्यक प्रांतपाल चंद्रपूर यांच्या अध्यक्षेत 19 ऑगस्ट 2023 ला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेकरिता बल्लारपूर व चंद्रपूर तालुक्यातील 24 शाळेतील 185 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ही स्पर्धा 13 व 16 वर्षाखालील शालेय मुलांकरिता दोन गटात एकेरी व दुहेरी स्वरूपात घेण्यात आली.
20 ऑगस्ट 2023 ला आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मुख्य अतिथी घनश्याम मूलचंदानी माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, पाटील साहेब ट्रॅफिक इनचार्ज चंद्रपूर जिल्हा, निलेश माळवे ट्रॅफिक इनचार्ज बल्लारपूर, स्नेहा भाटिया संस्थापक हिरकणी क्लब बल्लारपूर, राहुल वरू अध्यक्ष रोटरी बल्लारपूर, चैतन्य पटेल अध्यक्ष रोट्रॅक्ट बल्लारपूर, निखिल गुजरकर सचिव रोटरी बल्लारपूर यांची उपस्थिती होती.
यावेळी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर प्रास्ताविकेत रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी स्पर्धा घेण्यामागचं उद्देश समजावून सांगितला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व शील्ड प्रदान करण्यात आले. यावेळी घनश्याम मूलचंदानी माजी नगराध्यक्ष बल्लारपूर यांनी आपल्या मनोगतात रोटरीने घेतलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली. मुलांमधील सुप्त गुणांना, क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. रोटरीच्या विविध उपक्रमासाठी आपले सतत सहकार्य असेल असे सांगितले. स्नेहा भाटिया यांनी मुलांना खेळाबाबत प्रोत्साहीत केलं. राहुल वरू अध्यक्ष रोटरी बल्लारपूर यांनी आपल्या मनोगतात रोटरी बल्लारपूर द्वारा आयोजित विविध उपक्रमांची व होऊ घातलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
ही आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षाखालील गटात एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक युवाण अग्रवाल, नारायणा विद्या चंद्रपूर व द्वितीय क्रमांक पलक यादव आयडियल कॉन्व्हेंट बल्लारपूर तर दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्णव सोनटक्के व युवाण अग्रवाल नारायणा विद्या चंद्रपूर व द्वितीय क्रमांक सक्षम गौतम व चन्द्रेश वर्मा, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर यांनी मिळविला. तसेच 16 वर्षाखालील गटात एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक नवनीत शर्मा साईबाबा कॉन्व्हेंट बल्लारपूर तर द्वितीय क्रमांक शर्वरी पाटील बी.जे.एम.कॉरमेल चंद्रपूर तर दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक आरुष कुकडपवार व अद्वित दासरवार बी.जे.एम.कॉरमेल चंद्रपूर तर द्वितीय क्रमांक रितुराज शर्मा व ओम निकोडे साईबाबा कॉन्व्हेंट बल्लारपूर यांनी मिळविला. या स्पर्धेतील सक्षम गौतम, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर व अंतरा चव्हाण दिलासाग्राम कॉन्व्हेंट बल्लारपूर यांची इमर्जिंग प्लेयर ने निवड करून बॅडमिंटन रॅकेट बक्षीस स्वरूपात देण्यात आली. या स्पर्धेकरीता विलास बोबडे व कार्तिक उजाडे यांनी पंचाची भूमिका नीट बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी केले.
या उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर रोटेरियन मनीश मूलचंदानी व रोटे.अनुप गंगशेट्टीवार यांनी अथक परिश्रम घेतले. रोटेरियन प्रफुल चरपे, उमेश पटेल, कल्पेश पटेल, राजू मुंधडा, महेश कायरकर, अखिल निखारे, प्रशांत दोंतुलवार, उत्तम पटेल,रवी साळवे, प्रशांत भोरे, सचिन तल्हार, वैभव मेनेवार, अजय वासलवार, विक्रांत पंडित तर रोट्रॅक्टर अनुज अग्रवाल, आकाश गेडाम, गौरव पटेल, मोहित पटेल, रजत परमार, जयेश पटेल व भाविक पटेल, अमोल गांधी ,राजू पटेल यांचे सहकार्य लाभले.

