पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरट्यांनी 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेहुल पिल्लई असे फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मेहुल पिल्लई यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने कोंढवा पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज क्रमांक – 112/2023 दिला होता. त्यात म्हटल होत की, अर्जदार श्री मेहुल पिल्ल्ई यांचे MOBIKWIK चे E- Wallet चा आयडी व पासवर्ड अज्ञात इसमांनी घेवून त्याव्दारे त्यांचे अकाऊंट टेकओवर करून 60 हजार रूपये अज्ञात इसमांनी काढले अशी तक्रार दाखल केली होती.
ही फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत संबधीत नोडल कंपनीबरोबर लागलीच फोन वरून तसेच ईमेल व्दारे संपर्क करून अर्जदार यांना सदर रक्कमे मधील एकुण 58, 500 रूपये परत मिळवून देण्यात आले आहेत. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आज एका तरुणाला त्याचे पैसे परत मिळाले.
सदरची कार्यवाही वपोनि संतोष सोनवणे कोंढवा पोस्टे, पोनि संदिप भोसले गुन्हे, कोंढवा पोस्टे, पोनि संजय मोगले गुन्हे कोंढवा पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोशि. 10018 शेलार यांनी केलेली आहे.

