Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा ग्रामपंचायतीने सन २०१७-१८ पासून स्वनियोजित निर्णय घेत सात वर्षे पासून मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी सामान्य फंडातून दोन हजार रुपयाची मदत देत असते. आणि ही मदत आजतागायत अविरत चालवलेली चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.

मागील सन २०१७ मध्ये ग्रामपंचायत हिवरा येथे स्थापन झालेली कमिटीनी त्या दरम्यान ठराव मंजूर करत गावातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना (तो गरीब असो वा श्रीमंत) दोन हजार रुपये सामान्य फंडातून मदत करायचे असे ठरले. त्या दरम्यान माजी सरपंच सौ. सुशीला निलेश पुलगमकर उपसरपंच श्री. प्रकाश हिवरकर व त्यांची सदस्य कमिटी आणि ग्रामपंचायतीवरील सचिव तथा कर्मचाऱ्यांनी गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती मृत्त पावल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळते त्या दुःखात असलेल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी थोडीफार मदत होईल या दृष्टिकोनातून दहन व दफन (अंत्यसंस्कार) साठी त्यांना सामान्य फंडातून दोन हजार रुपये अविरत मदत देण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हापासून त्या कमिटीने अंत्यसंस्कारसाठी दिली जाणारी मदत सन २०२०-२१ पर्यंत सतत चालवली.

दरम्यान आताची सन २०२१ नंतर विद्यमान कमिटी सरपंच श्री.निलेश पुलगमकर व उपसरपंच सौ.वर्षा कूत्तरमारे आणि त्यांच्या कमिटीने त्या निर्णयाला कायम ठेवत अजूनही हे अंत्यसंस्काराची मदत सेवा अविरत देत आहे. जवळपास या निर्णयानंतर सात वर्षाच्या कालावधीत हिवरा गावातील शंभर ते सव्वाशे मृत्त पावलेल्या कुटुंबीयांना सामान्य फंडाचे दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून अंत्यसंस्कारासाठी हिवरा ग्रामपंचायतीने मदत दिली आहे. अशी निरंतर व अविरत मदत सेवा देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.

दरम्यान या दोन महिने पूर्वी सामान्य फंडाच्या अपुऱ्या निधीमुळे गावातील महिनाभरापूर्वी मृत पावलेल्या कुटुंबीयांना अंत्यसंस्काराची मदत वेळेवर देणे शक्य झाले नसल्याने त्यांची मदत फंडात काही अल्प प्रमाणात निधी जमा झाल्यावर तात्काळ गावातील कूत्तरमारे, लखमापुरे व चहारे या तीनही कुटुंबांना मदत देऊन ही अविरत मदत सेवा कायमस्वरूपी चालवणार, व समोरील येणाऱ्या ग्रामपंचायतीवरील कमिटीने सुद्धा चालवावी अशी आशा व्यक्त करत असल्याचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.निलेश पुलगमकर यांनी सांगितले. दरम्यान सरपंच निलेश पूलगमकर, उपसरपंच वर्षाताई कुत्तरमारे, सदस्य जितेंद्र गोहणे, सदस्या पुष्पाताई हिवरकर, सदस्या प्रतिमाताई आक्केवार, सदस्य देवानंद आक्केवार, सदस्या अरुणाताई नेवारे, ग्रामसेवक पी.डी. राऊत, ऑपरेटर उमेश पूलगमकर, शिपाई विद्या गुंडावार, चेतन पुलगमकर ग्रामपंचायतीवर सेवा देत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा तालुक्यातील वीरूर स्टेशन येथे राबवण्यात आले घर चलो अभियान.

Next Post

झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.

झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In