उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे अधिमंडळाची वार्षिक सभा रविवार दिनांक २७ ऑगस्ट या रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेची सुरुवात अण्णाभाऊ साठे आणि महापुरुषाच्या पुतळ्यास पुषपहार घालून आणि त्यानंतर महिलांनी बुद्ध वंदना घेतली त्या नंतर काल कथित सभासदास श्रध्दांजली देऊन सभेस सुरवात झाली.
या सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. मोरेश्वर सुखदेवे सरांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी सभेमध्ये वार्षिक अहवाल वाचून दाखवला. यावेळी प्रामुख्याने अकरा विषयावर सकारात्मक चर्चा झाली. काही सभासदांनी आपल्या शंका विचारल्या आणि त्या सर्व शंकेच निरसन डॉ. सुखदेवे यांनी केलं सर्व विषय समजून सांगितलं आणि ३१ मार्च २०२३ चा वार्षिक आहवल मंजूर करण्यात आला.
या सभेत सर्व सभासद आणि संचालक मंडळ यांच्या विचार विनिमायातून सर्व विषय मंजूर करणेत आले. या सभेचे प्रवक्ते डॉ. आनंद जोगदंड सरांनी प्रास्ताविक केले त्या मधे त्यांनी आपण संस्था स्वबळावर उभी करायची आहे. बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची वाढ करणेसाठी एक समन्वय समिती स्थापन करू असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ गौतम मगरे सर यांनी माडले.
या सभेस सर्व सभासद व संचालक प्रामुख्याने हजर होते. अशा परीने बोधिस्त्व रुग्णालयाची सभा अत्यंत खेळीेमेळीत वातावरणात पार पाडली. ही सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हॉस्पीटलच्या संचालका बरोबरच हॉस्पीटच्या अधिक्षक आयुमती पल्लवी गायकवाड यांचा व सर्व स्टाफ व बोधीसत्व कार्यकर्ता गृप यांचा सहभाग लाभला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

