अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मोबा. 7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- रक्षबांधन हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. उद्या राखी पौर्णिमा असल्यामुळे गुरुकुल शाळा पेणच्या वतीने आत्मसंयम, त्यागाचे प्रतीक असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी जवानांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गुरुकुल शाळा पेण मुख्याध्यापिका झेमसे मॅडमयांच्या नेतृत्वाखाली पेण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम गुरुकुल शाळेतील मुख्याद्यापिका आणि शिक्षकवृंद तसेच विद्यार्थीनी यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जिवाची पर्वा न करता बंधू रूपात अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असतात म्हणून पेण येथे या भावांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अग्निशामक दलाचे ड्राइवर ऑपरेटर अजय नाईक, अभिषेक बंगाले अग्निशामक अभिजित गुरव, दर्शन निंबरे, प्रसन्न पाटील उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348