अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- शहरांमध्ये युवा सामाजिक राजकीय अभ्यासू डॅशिंग नेतृत्व असणारे दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष संघर्ष फुले यांनी 28 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन युवा आघाडी चे शहराध्यक्ष रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवाघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
संघर्ष फुले हे फुले आंबेडकर चळवळीमधील सामाजिक चळवळीमधील राजकीय चळवळीमध्ये एक युवा नेतृत्व मानल्या जात आहे. सामान्य माणसाला अहोरात्र मदत करणे कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला गतिमान करणे हे एक ध्येय त्यांच्या मनामध्ये होतेच बाबासाहेबांनी ज्याप्रकारे दिन दुबळ्यांना मायेचा आधार दिला त्याच प्रकारे आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर शोषित पीडित समाजाला आधार देण्याचे काम करीत आहे. प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करावा असे मनोगत संघर्ष फुले यांनी व्यक्त केले.
यावेळी जाहीर प्रवेश घेताना अमरावती महानगर अध्यक्ष रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे , सिद्धार्थजी भोजने, मिलिंद दामोदरे, राष्ट्रपाल वानखडे, सिद्धार्थ दामोदरे, नितीन कांबळे, राज भगत, राज तांनवटकर, शैलेश बागडे, बांबुर्डे सर, कांबळे दादा, नंदू तायडे, अनिल गडलिंग, सुरेंद्र खडसे, राजेश तायडे, राज राऊत, भूषण चव्हाण, सुरेश गुडदे, प्रशिक ढोके, कमल कुमार, गवई बंबू, चाचा युसूफ भाई घोडेवाले, दीपक बोरकर, शुभम गेडाम, सनी इंगळे, माधुरीताई बनसोड, जयाताई मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते येणाऱ्या रविवारी शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन युवा आगाडीमध्ये जाहीर प्रवेश करत आहे.

