तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलईन गडचांदूर:- नोकारी हे गाव शहरापासून अंतरावर असुन येथे आरोग्य सुविधा (डाॅक्टर) नाही सध्या गावात विविध आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त आहे व काही आजारी सुध्दा आहे. व काही लोकांची आर्थिक परिस्तिथी कमजोर असल्याने उपचार व तपासणी करुन रोगाचे निदान करू शकत नाही हे लक्षात घेऊन पोलीस बाॅईज संघटना मार्फत व वामन तुरानकर ऊपसरपंच याचे सहकार्यातुन रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येऊन औषध वितरीत करण्यात आले.
यावेळी शिंदे साहेब पोलीस निरीक्षक गडचांदूर, निलेश भाऊ ताजणे ,सौ.मणीषाताई पेंदोर सरपंच,वामन तुराणकर ऊपसरपंच, नागेश गेडाम पो.पाटील, मडावि साहेब पो.हवालदार, कर्णु पाआदे, माजी पो.पाटील, देवराव ढोले माजी उपसरपंच, लक्ष्मण पाटील पेंदोर, बालाजी मुगावे साहेब शल्यचिकित्सक, सौ.तृप्ती मुगावे माॅडम स्त्रीरोगतज्ज्ञ, डाॅ शिवम लांडगे एम.बि.बि.एस. याचे व्दारे सर्व रुग्णाची तपासणी करण्यात आली व औषध उपचार करण्यात आले व यावेळी पोलीस बाॅईज संघटनेचे सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, मदतणीस, सीआरपी, मोबीलायजरतसेच ग्रा.प सदस्य, कर्मचारी व ग्रामवासी उपस्थित होते.