Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 31, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.३०/०८/२०२३ रोजी ०२:३० वा सुमा. वाकड पोलीस स्टेशनकडील राजगस्त अधिकारी पोउपनि रोहीत दिवटे है राजगस्त करीत असताना कोकणे चौक येथे काही महीला व पुरुष घाईगडबडीत गोंधळलेल्या अवस्थेत जाताना दिसून आलेने त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचे घरातील दोन लहान मुली रात्री राखी खरेदी करणेकरीता गेल्या होत्या त्या अदयाप पर्यंत परत आलेल्या नाहीत. पोउपनि रोहीत दिवटे यांनी सदर गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या सर्वांना वाकड पोलीस स्टेशन येथे घेवून आले. त्यांचकडुन प्राथमीक माहीती प्राप्त करता असे समजले की, सारीका कैलास ढसाळ वय ३८ वर्षे रा. कौतीक हॉटेलचे पाठीमागे, रामनगर रहाटणी पुणे या त्यांची आई पुष्पा आल्हाट यांचे सोबत राहणेस असून त्यांच्या लग्न झालेल्या दोन बहीणी मुलांसोबत रक्षाबंधन निमीत्त रहाटणी येथे आलेल्या होत्या. त्यातील त्यांची बहीण नामे शितल सचिन मोहीते रा. वाघोली पुणे यांची मुलगी वय १५ वर्ष व सारीका कैलास ढसाळ यांची मुलगी वय ०२ वर्ष या राखी खरेदी करणेकरीता दि. २९/०८/२०२३ रोजी रात्री ८.०० वा सुमा. घराचे बाहेर गेल्या होत्या. त्या दोघीही त्यावेळेपासून मिळून येत नाहीत अशी हकीकत सांगीतलेने पोउपनि रोहीत दिवटे यांनी वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ८४९ / २०२३ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मुलीचे वर्णनाबाबत नियंत्रण कक्ष येथे माहीती देवून ब्रॉडकास्ट करणेत आला.दाखल गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री. डॉ. संजय शिंदे सो सह. पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड व मा. श्रीमती स्वप्ना गोरे पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी त्यांचे अधिनस्थ वाकड तपास पथकाकौल पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट नं.०४ यांचे वेगवेगळे टिम तयार करून लहान मुलींचा शोध घेवून मुलींची सुटका करुन, आरोपींना अटक करणेबाबत सुचना दिल्या. मा. श्री. काकासाहेब डोळे, मा. श्रीमती स्वप्ना गोरे व मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिचवड असे स्वतः वाकड पोलीस स्टेशन येथे अपहृत मुली व आरोपी मिळेपर्यंत थांबून तपास टिमला मार्गदर्शन करीत होते.तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांचे घरातील सर्व व्यक्तींची चौकशी केली. त्यावेळी अपहरत मुलगी हीचे वडील सचिन मोहीते हे हजर होते. त्यांनी फिर्यादी प्रमाणेच हकीकत सांगीतली होती व ते सदर घटनेची माहीती त्यांना प्राप्त झाले नंतर वाघोली येथुन आलेचे त्यांनी सांगीतले. तपास पथकातील अधिकारी, अंमलदार सदर अपहरत मुली ज्या रस्त्याने बाहेर पडल्या होत्या तेथील सिसीटीव्ही फुटेज पाहणी व स्थानिक नागरीक तसेच दुकानदारांकडे चौकशी करणे सुरु केली. यादरम्यानचे काळात सचिन मोहीते हे कोणास काहीएक न सांगता ते चालवित असलेली कार सव्हिसींग साठी सोडणेसाठी जात असलेचे सांगून कोठेतरी निघून गेले होते. अपहरत मुलगी हीची आई शितल सचिन मोहीते यांनी सकाळी १०.०० वा सुना. चौकशी करीत असलेल्या पोलीस अधिका-यांना असे सांगीतले की, फिर्यादी सारीका ढसाळ यांचा सुमारे ०३ महीने पूर्वी गहाळ झालेल्या मोबाईल नंबर वरून त्यांना व त्यांचे पति सचिन मोहीते यांचे मोबाईलवर सकाळी ०७.१५ वा सुमा फोन आला असुन त्यावरुन बोलणारे व्यक्तीने ‘तुमच्या मुली सुखरुप पाहोजे असतील तर पोलीसांना काही न सांगता १० लाख रुपये दया नाहीतर तुमच्या मुलींचे बरेवाईट करेन अशी धमकी दिलेची माहीती दिलेवरून शितल मोहीते यांना सदर फोनवर आपले बोलणे झाले अथवा आपले पतिचे बोलणे झाले याबाबत विचारले असता त्यांनी पति सचिन मोहीते याचेच बोलणे झाले आहे असे सांगीतले. यादरम्यान सिसीटीव्ही पाहणी करीत असणा-या टिमला सदरच्या मुली घरातून बाहेर पडुन मुख्य रस्त्यावर येवुन कोणत्यातरी कार मध्ये बसून जाताना दिसल्या व सदरची कार सचिन मोहीते चालवित असणा-या कारचे वर्णनाशी मिळती जुळती होती. त्यामुळे सदर प्रकारात सचिन मोहीते यांना काहीतरी माहीती असुन ते जाणीवपूर्वक कुठेतरी निघुन गेले असल्याचे संशय पोलीसांना आला.सचिन मोहीते याचे मोबाईल फोनचे लोकेशन द्वारे माहीती घेतली असता तो पुन्हा वाघोली येथे गेलेचे निष्पन्न झालेने तपास पथकातील सपोफी काळे, सपोफी इनामदार व पोहवा गिरे यांनी तात्काळ वाघोली येथे जावुन सचिन मोहीते यास तांत्रीक तपासाद्वारे ताब्यात घेतले, त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने सदर दोन्ही मुलींचे अपहरण हे त्यांची सासु पुष्पा चंद्रकात आल्हाट रा. रामनगर रहाटणी पुणे यांना भिती दाखवून त्यांचे बँकेत असणारे जंगम मालमत्तेतील १० लाख रुपये मिळविण्यासाठी सदरचा अपहरणाचा बनाव केल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यास दोन्ही मुली कोठे आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, मी मुलींना वाघोली येथे एका ठिकाणी ठेवले असून त्यांना सकाळी १०.०० वा नंतर वाघोली येथून निघुन मनपा पुणे येथे येण्यास सांगीतले होते असे सांगीतले. त्यामुळे लागलीच मुली ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जावून पाहणी केली असता मुली मिळून आल्या नाहीत. त्यानंतर सदर मुली पीएमपीएमल बसने प्रवास करीत मनपा पुणे येथे पोहोचतील याहेतुने सर्व अधिकारी अंमलदार सदर ठिकाणी जावुन थांबले. परंतु प्रवासाला लागणारे वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरी मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सदर बाबत चिंता वाढत गेली. मा. वरिष्ठांना सदर बाबत माहीती दिलेवरुन गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांचेकडील ७३ पथके पुणे मनपा येथे रवाना करणेत आले. पीएमपीएमल व्यवस्थापन यांचेशी बोलून चालक वाहक यांचे वॉट्सअप ग्रुप अस्तित्वात असतील तर त्यावर दोन्ही मुलीचे फोटो टाकुन जर त्या प्रवास करताना मिळुन आल्यास ताब्यात घेणेबाबत कळविले. दुपारी १३.३० वा सुमा. सदर मुली पीएमपीएमल बसने मनपा पुणे येथे आलेवर पोहवा. गवारी, पोना. चव्हाण यांनी त्यांना ओळखून सुखरुप ताब्यात घेतले.आरोपी सचिन मोहीते याने सदरचा गुन्हा हा सासु नामे पुष्पा आल्हाट यांचेकडुन १० लाख रुपयांची खंडणी वसुल करणेसाठी केल्याचे निष्पन्न झालेने सदर गुन्हयात भाविक ३६४ (अ), ३८५ या अंतर्भाव करणेत आला आहे. आरोपी सचिन मोहीते बास गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हा करणेसाठी वापरलेला मोबाईल फोन हस्तगत करणेत आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

सदरची करवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि- २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि रोहीत दिवटे, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, पोहया बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा प्रमोद कदम, पोहवा. अतिश जाधव, पोना. अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना, प्रशांत गिलबीले, पोशि भास्कर भारती, पोशि, अजय फल्ले, पोशि रमेश खेडकर, पोशि कौंतेय खराडे, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) तसेच गुन्हे शाखा युनिट नं.०४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. शंकर आवताडे, पोउपनि रायकर व अंमलदार यांनी मिळून केली आहे.

Previous Post

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.

Next Post

भारतीय जनता पार्टी के चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा इनके जन्मदिन पर लकी ड्रा में मिला गिफ्ट, जरूरतमंद परिवार को कर दिया भेट.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भारतीय जनता पार्टी के चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा इनके जन्मदिन पर लकी ड्रा में मिला गिफ्ट, जरूरतमंद परिवार को कर दिया भेट.

भारतीय जनता पार्टी के चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा इनके जन्मदिन पर लकी ड्रा में मिला गिफ्ट, जरूरतमंद परिवार को कर दिया भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In