हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याशी खेळखंडोबा १३ वर्षाचा मुलीला नीट उपचार न मिळाल्याने डेंग्यूच्या आजाराने मृत्यू …
उपजिल्हा रुग्णालयात एकाच बेड वर दोन रुग्णांची होत असतात ट्रिटमेंट, उपकरणे आणि स्टाप नसल्याने सतत रुग्णांना सेवाग्राम, सावंगी येथे करत असतात रेफर.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपजिल्हा रुग्णालय येथील ड्रामा केयर युनिट केंद्र तसेच उपजिल्हा शंभर खाटाचा दवाखाना असून जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे. रुग्णालयात आवश्यक उपकरणे नसल्याने गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने इतरत्र अर्थ रेफर केला जात असल्याने अनेकांच्या नशिबी मृत्यू येत आहे. आज हिच पार्षभूमी समजून उपजिल्हा रुग्णालय येथील वैदकिय अधिक्षक डॉ. किशोर चाचरकर यांच्या मार्फत जिल्हा वैदकिय अधिक्षक वर्धा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट शहरांमध्ये डेंगू व कावीळ या साथीच्या रोगाने थैमान घातलेले आहे. प्रत्येक वार्डा वार्डात डेंगू व कावीळ रुग्ण आढळून येत आहे याकडे प्रशासनाचे चक्क दुर्लक्ष होत आहे. नुकताच दिनांक 31 जुलै 2023 रोजी डांगरी वॉर्ड येथील 13 वर्षीय कुमारी तनवी जितेंद्र मसादे ही मुलगी डेंगू ने दगावली. तिला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बरोबर ट्रीटमेंट न करता सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले परंतु वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
तसेच चौधरी वॉर्ड नगरपरिषद कॉलनी येथील २५ ते ४० लोकांना कावीळ डेंगूच्या साथीची लागण झालेली आहे या परिसरातील रहिवासी सौ रेणुका मुर्डिव व त्यांची लहान मुलगी सर्वेश्री मुर्डीव यांच्यासह नगरपालिका कर्मचारी विशाल ब्राह्मणकर यांच्या मुलाला सुद्धा कावीळ झालेला असून रिटायर कर्मचारी श्री मुळे यांचा मुलगा गौरव मुळे याला पिलीया रोग झाला आहे या परिसरातील अशा अनेक लोकांना डेंगू व काविळ ची लागण झाली आहे शहरातील गटार योजनेच्या माध्यमातून डेंग्यू आपले साम्राज्य शहरात मोठ्या प्रमाणात पसरवत आहे ही हिंगणघाट शहराची शोकांतिका आहे. की याकडे लोकप्रतिनिधी व शासन प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही शासन/प्रशासन झोपेचे सोंग घेऊन गाढ झोपी गेलेली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात सर्पदअंशावर अजिबात उपचार होत नाही हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात विषारी सापाने दंश केलेल्या रुग्णावर उपचार न करता त्यांना थेट सेवाग्राम, सावंगी मेघे रुग्णालयात पाठवण्यात येते या रुग्णांना उपचाराकरिता नेत असताना त्यांचा वाटेतच सरपंच झालेल्या रुग्णांचा उपचारा भावी मृत्यू झाला असे दिसून येते.
वर्धा नंतर जिल्ह्यात हिंगणघाट शहर सर्वात मोठे शहर असून या शहराची मोठी बाजारपेठ आहे तसेच संपूर्ण हिंगणगाव शहराची व तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे प्रचंड लोकसंख्या असलेल्या या शहरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहरातील नॅशनल हाइवे मोठ्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे अशा अनेक गोष्टीमुळे लोकांचा घातपात होत असतात. परंतु शहरातच उपजिल्हा वेळीच उपचार होत नसल्याने व रुग्णालयातील अपुऱ्या सुविधामुळे रुग्णांना सेवाग्राम, सावंगी, नागपूर मेडिकल येथे रेफर केल्या जाते. रेफर केल्यानंतर असे अनेक रुग्ण आहे की ते रस्त्यातच वेळीच उपचार न मिळाल्याने दगावतात.
अनेकदा निवेदन दिल्ली असता त्या निवेदनांना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे परंतु आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेली उपकरणे दुरुस्ती करण्यात यावी व संपूर्ण आजारावर योग्य उपचार करण्याच्या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावा ही शेवट ची मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यानंतर काहीही एकूण न घेता आक्रमक पाऊल उचलनार अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई मिर्झा, संतोषराव तिमांडे गुरुजी, अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, सौ पाटील मॅडम, किशोर चांभारे, सुधाकर वाढई, मारोती महाकाळकर, अनिल लांबट, उमेश नेवारे, प्रशांत लोणकर, गोमाजी मोरे, नदीम भाई, पुरुषोत्तम कांबळे, सुभाष सोयाम, अंकुश दळवी, नीरज मुसळे, कुणाल एसंबरे, पप्पू आष्टीकर, रत्नाकर हिवरे, अनिल भुते, बच्चू कलोडे, गजानन महाकाळकर, अमोल मुडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, पंकज भट, राहुल जाधव, वैभव साठोने, विपुल वाढई, नंदू काळे, रोहित लेदे, स्वप्निल पांडे, मनीष मुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना अतुल वांदिले म्हणाले की, शहरात प्रत्येक वॉर्डात डेंग्यू आणि कावीळ चे साम्राज्य पसरलेले आहे प्रत्येक वॉर्डात २५ ते ५० रुग्ण ही डेंग्यू व कावीळ या साथीच्या रोगाने त्रस्त आहे परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे यासंदर्भात शहरातील अनेक पक्षांनी, संघटनेची अनेकदा निवेदने दिली असता उपजिल्हा रुग्णालय यांनी फक्त आश्वासने दिली आणि आतातर काय ४०० बेडच्या खाटाच आमदार साहेबांनी थाटा माटात उद्घाटन केले, मोठं -मोठे बॅनर झळकावले गाजा-वाजा केला संपूर्ण श्रेय घेतलं आणि बघतो तर काय २ महिने झाले ४०० बेड तर सोडा धड १०० बेड मध्ये नागरिकांना सुविधा मिळत नाही, आवश्यक उपकरणे नसल्याने गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना सेवाग्राम, सावंगी येथे रेफर केल्या जाते आणि जाता जाता मध्येच अनेक रुग्णाचा मध्येच मृत्यू होते याकरिता यावर शासनाने/प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

