मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्यात यावा आणि त्याच पद्धतीने नवीन गाड्यांचे थांबा देण्यात यावा, असे वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार रामदास तडस, नितीन गडकरी, आमदार समीर कुणावर यांच्याकडे मांडले. कोरोना काळात हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील सर्व गाड्यांचे थांबे बंद होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने टप्या टप्या ने काही मोजक्या गाड्यांचे थांबे दिले होते. याकरिता यात्री संघाला बराच संघर्ष करावा लागला. रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
बल्लारशाह – मुंबई गाडी रोज सुरू करावी, बल्लारशाह – पुणे ही गाडी रोज सुरू करण्यात यावी, हिंगणघाट स्थानकावरील बंद करण्यात आलेले लखनौ, अहिल्यानगरी, कोरबा, रायपूर, जोधपूर, बिकानेर (हिसरा), धनबाद-कोल्हापूर या सर्व गाड्यांचे थांबे पुर्ववत सुरू करण्यात यावे, नागपूर-माजरी-आदिलाबाद व बल्लारशाह-भुसावल पॅसेंजर सुरू करण्यात यावी, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दक्षिणेकडे जाण्यासाठी फूट ब्रिज बांधावा, वंदे भारतसाठी रेल्वे ट्रॅक रिकामा आहे पण गरीबांसाठी प्रवासी ट्रॅक रिकामा नाही. कलोडे चौकाच्या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, हिंगणघाटला जिल्हा बनवून द्या, हिंगणघाट येथे क्रीडा स्टेडियम बांधावे आदी विविध मागण्यांसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी यात्री संघाचे डि.के. गुरनुले, राजेश अ. कोचर, डॉ. विजय पर्बत, दिलीप बालपांडे, किरण वैद्य, विजय मुथ्था, लिलाधर मडावी, किशोर रहेजा, तपेश चंदाराणा, रवि जुमडे, रमेश खियानी, मुन्ना त्रिवेदी, जयेश सेमुअल, दिनेश मोटवानी, राजु चौधरी, राजेश बतरा, कपिल निखाडे, अरूण दुधे, शुभम शर्मा, हरिष सिंघवी, राकेश नल्लावार, रामलाल शर्मा, फुलझेले, नरेंद्र नायडु, राष्ट्रपाल कांबळे, गौरव पाटील, प्रकाश कुरेकार आदींची उपस्थिती होती. ही माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

