मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.११ सप्टेंबर:- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदि (रेल्वे) विधानसभा क्षेत्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे जीवितहानीसह मोठे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विज कोसळल्याने जनावरे मृत झाली, यावेळी शेतकरी व इतरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
समुद्रपूर तालुक्यातील आपत्तीग्रस्त नागरीकांना तसेच मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना असे एकुण ११ कुटुंबियांना शासकिय मदतीचे धनादेश आज दि.११ रोजी आ. समिर कुणावार यांचे शुभहस्ते वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे,भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या हानीची वेळोवेळी दखल घेऊन मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांसह ज्यांची गुरे ढोरे दगावली तसेच ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले, या सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना शासनाचे वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.
आज आयोजित कार्यक्रमात नुकत्याच काही दिवसांपुर्वी विज कोसळल्याने मृत पावलेल्या पौर्णिमा गोपाल कासार व ज्ञानेश्र्वर लक्षण जांभुळे या दोन दिवंगत व्यक्तीचे वारसांनाही मदतीचे प्रत्येकी ४ लक्ष रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी आत्महत्याग्रस्त कुत्तरमारे कुटूंबातील वारसांसही मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

