अक्षय जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन सातारा:- शिवाजी, फुले, शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक तेढ वाढत आहे. त्यात सोशल मीडिया मधून अजून आगीत तेल घालून ती आग पेटवल्या जात आहे. त्यामुळे राज्यात मागील काही महिन्यापासून अनेक स्थिकानी दंगली होऊन अनेक लोक जख्मी झाले आहे. अशीच एक घटना सातारा जिल्हातील पुसेसावळीतून समोर आली आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार वय 27 वर्ष पुसेसावळी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला. यावेळी त्यांनी थेट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
त्यामुळे या आंदोलन कर्त्यानी जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबत पुरवणी तक्रार देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. भेटीत झालेल्या चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने त्या युवकाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
ही दंगल झाल्यानंतर दिवसभर गावात तणावपूर्ण वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिकलगारचा मृतदेह पुसेसावळीत आणण्यात आला. त्यावेळीही मोठा पोलिस बंदोबस्त होता. जखमी सरफराज बागवान यांच्या फिर्यादीवरून औंध पोलिसात तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जाळपोळीची घटना काल रविवारी रात्री घडली होती. यामुळे पुसेसावळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445340