पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरनं १०४ / २०२३ भादवि कलम ४२०, ४१९ ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ड अन्वये गुन्हयातील फिर्यादी यांना आरोपीतांनी वॉट्सअॅप व्दारे संपर्क साधून त्यांना पार्ट टाईम नोकरीचे बहाण्याने गुगल सर्च टास्क देवून जास्त कमिशन मिळेल असे आमिष दाखवून त्यांना टास्क पूर्ण केल्यावर कमीशन म्हणून फिर्यादी यांचे बैंक अकाउंटला काही किरकोळ रक्कम जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक फायदयाकरीता फिर्यादीस टेलीग्राम ग्रुपवर प्रीपेड टाक्स करण्यास सांगून वेळोवेळी जास्त रक्कम डिपॉझीट करण्यास लावून त्यांचेकडून विविध टास्क करुन घेतले व कोणताही परतावा न देता फिर्यादी याची रक्कम रु. ३४,९७,०००/- ची ऑनलाईन फसवणूक 1. म्हणून दिले तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. केली.
सदर गुन्हयातील फिर्यादी यानी त्यांची रक्कम ट्रान्सफर केलेले आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक १६१०५५०१४६५ याची माहिती प्राप्त करून घेतली. तसेच सदर अकाउंट मधून गुन्हयातील काही रक्कम SPAY TECHNOLOGY PVT या पेमेन्ट गेटवे कंपनीच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. सदर माहितीचे तसेच SPAY TECHNOLOGY PVT या कंपनीच्या एजन्टकडे तपास करता आरोपी नामे तुषार अजवानी याने पुरविलेल्या वॉलेट ॲड्रेसवर सदर गुन्हयातील फसवणूकीची रक्कम युएसडीटीच्या स्वरुपात ट्रान्सफर झाल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. गुन्हयातील प्राप्त माहितीचे आधारे आरोपीताचा ठावठिकाणा हा जुहू मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिनांक १२/०९/२०२३ रोजी सायबर पोलीस स्टेशन कडील पोउनि सचिन जाधव, पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जावा, नवनाथ जाधव, चालक सुनिल सोनुने जसे पथक मुंबईकडे रवाना केले.
सदर पथकास दि. १३/०९/२०२३ रोजी आरोपी नामे तुषार प्रकाश अजवानी, वय ३७ वर्षे, रा. बी १२०, वॉटरफोर्ड जूहू लेन, अंधेरी वेस्ट, मुंबई हा मिळून आल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतले व सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आणण्यात आले. आरोपीताचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीतास दि. १४/०९/२०२३ रोजी सकाळी ११.१५ वा. अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीताकडून एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्र. ७, पुणे यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्हयाचे गांभिर्य पाहून दि. १८/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तरी आरोपीताकडे सखोल तपास करुन त्याचे साथीदारांना शोध घेण्यास प्रयत्नशील आहोत.
सदरची कारवाई मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णीक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, आर. एन. राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील व.पो.नि. मिनल सुपे पाटील, पोलीस उप निरीक्षक सचिन (जाधव, पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनिल सोनुने, संदेश कर्णे, नितीन चांदणे, शाहरुख शेख व निलेश लांडगे या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली. अशा प्रकारे टास्क फ्रॉड, पार्ट टाईम जॉब, जादा परतावा तसेच कमीशन मिळेल अशी आमीषे दाखविणाऱ्या गुन्हेगारी टोळयापासुन सावध राहण्याबाबत सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, पुणे शहर यांचेकडुन जनतेस आवाहन करण्यात येत आहे.

