देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर दिनांक 11:- सोमवारला आमदार निवास नागपूर येथे लोक कलावंताची मीटिंग प्रकाश काळे गुरुजी,अनिल पारखी शाहिर ललकार चव्हान यांनी मीटिंग आयोजित केली होती. लोकलावंता च्या मीटिंग चे डॉ. त्रीलोक हजारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी विलास भोंगळे, सकाळ वृत्तपत्राचे आवृत्तीसंपादक प्रमोद काळबांडे ,विनायकजी इंगळे,अंकुश बुरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक कलावंताची मीटिंग घेण्यात आली. लोककलावंताच्या समस्या बद्दल अनेक शाहिर कलावंतांनी आपले विचार व्यक्त केले व मीटिंग कलाकारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित कलावंतानी प्रकाश काळे गुरुजी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी शाहिर सुबोध गुरुजी यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या सचिव पदी अनिल पारखी यांची निवड करन्यात आली. व सदस्यांची निवड करून संघटनेची स्थापना करण्यात आली .मीटिंग चे अध्यक्ष डॉ त्रिओक जी हजारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सकाळ चे आवृत्तीसंपादक प्रमोद काळबांडे यांनी लोक कलावंताच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित कलाकारांनी आपल्या समस्या, गरजा मांडल्या व संघटनात्मक सूचना देण्यात आल्या, प्रकाश काळे गुरुजी यांनी कलाकारांच्या व्यथा व मागण्या पूर्ण करण्यासाठी व लोक कलावांतावर होणाऱ्या अन्यासाठी संघटना स्थापन करण्याची कल्पना मांडली सर्व कलाकारांनी दुजारा देऊन संघटनेला मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपला पाठिंबा जाहीर केला.सर्व कलाकारांनी आयोजकांचे व प्रमुख पाहुन्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित डॉ त्रिलोकं हजारे, प्रकाश काळे गुरुजी, अनिल पारखी, विलास भोंगळे, विनायक इंगळे गुरुजी, अंकुश बूरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, डॉ शंकरराव भोंगेकर, सत्यवान कांबळे, शहीर मोरेश्वर शाहिर क्रिष्णाजी, शाहिर ललकार चव्हान, शहीरा वृंदाताई नागले, अ.भ.प शेषराव नरुले, डेबू मेश्राम, कवडू लाठे गोंधळ, शाहिर अंबदासजी नागदेवे, शाहिर ज्ञानेश्वर पाटील, शाहिर सुरेश बावणे, शाहिर अशोक मेश्राम, शाहिर ब्रम्हा नवघरे, शाहिर संजय मेश्राम, शाहिर रवींद्र मेश्राम, शाहिर अशोक लोणारे, गायिका कु पल्लवी नगराळे, शाहिर भगवान लांजेवार, शाहिर तुळशीदास शाहिर अपासराव शहीर गुलचंद, शाहिर अशोकराव खाडे, शाहिर देवीदास बंड, शाहिर प्रकाश तागडे, शाहिर सुरेश धडाडे, शाहिर मुकेश दुधलवार, शाहिर उध्दव बडगे, शाहिर रहिभान, शाहिर अरुण मेश्राम, भीम शाहिर प्रदीप कडवे, शाहिर धनराज वाडके,श्री चंदन पाटील,शाहिर अशोक मेश्राम, शाहिर अमोल ठाकरे,शाहिर कृष्णा वंदिले, शाहिर शेषराव चौधरी रामदास मानेराव,प्रा सिध्दार्थ मेश्राम,शाहिर सूरज नवघरे,मोठ्या संख्येने सर्वस्तरिय कलाकार उपस्थीत होते व त्यांना अनमोल मार्गदर्शन कवाल अनिरुद्ध शेवाळे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन अनिल पारखी यांनी केले.