राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- भोंदूबाबा, संत यांच्या कडून महिलेवर अत्याचाराच्या घटना वाढ झाली आहे. अशीच एक संतापजनक घटना पालघर जिल्हातून समोर आली आहे. येथील तलासरी तालुक्यात एका महिला पोलिस कर्मचारी एक भोंदूबाबाच्या वासनेची शिकार झाली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तलासरी तालुक्यात महिला पोलीस कर्मचारीवर एक नराधम भोंदूबाबाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित पोलीस कर्मचारी महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भोंदूबाबासह त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीसांनी रवींद्र नारायण बाटे वय 45 वर्ष याच्यासह दिलीप गोविंद गायकवाड वय 42 वर्ष, गणेश रामजी कदम, महेंद्र चंदाराम कुमावत आणि गौरव साळवी, यांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, घरात सुख-शांती राहील, असे सांगून भोंदूबाबाने आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पूजाविधी करण्यासाठी महिलेला मठात बोलावले. या मठाताही तिच्यावर अघोरी पूजा करत मित्रांसह महिलेवर अत्याचार केले.
या भोंदूबाबाने या महिला पोलिस कर्मचारीकडून 2 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेतले. नंतर त्याने पोबारा केला. यानंतरही भोंदुबाबाने महिलेला सतत ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पोलिस महिलेने तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

