पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच परदेशी नागरिकाद्वारे होणारी अंमली पदार्थाची तस्करीचा छडा लावुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत.
वरिष्ठानी दिलेले आदेश व सुचना नुसार अमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ यांना त्याबाबत सुचना दिल्या होत्या. दि.१५/०९/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते य सहा पो निरीक्षक शैलजा जानकर हे अधिकारी व स्टाफ लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर व पांडुरंग पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमली पदार्थ रेकॉर्डवरील परदेशी आरोपी नामे फिलीप विलीयम इडिली (PHILIP WILLIAM IDELE), हा त्याचे मैत्रिणीसह वेगवेगळे अंमली पदार्थ जवळ बाळगुन त्याची उरळी देवाची परिसरात विक्री करीत असतो.
नमुद मिळालेले बातमी प्रमाणे कायदेशिर कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते सहा पो निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ असे आर्चिवर इंटरनॅशनल स्कुल उरुळी देवाची पुणे चे मागील सार्वजनिक रोडवर आलो असता त्या ठिकाणी इसम नामे १ फिलीप विलीयम इडिली (PHILIP WILLIAM IDELE ), वय ४९ वर्षे सध्या रा. स.नं.५५/१/१ कोठारी फॅशन मांगे, आर्थिवर स्कुल मागे, उरुळी देवाची हडपसर पुणे. मुळ रा. गाव बिनी, लागोस स्ट्रीट, नायजेरीया देश तसेच महिला नामे २. त्याची मैत्रिण परदेशी महिला हे दोघे मिळुन आल्याने त्यांचेवर छापा कारवाई केली असता, त्यांचे ताब्यात २५ ग्रॅम ८ मिलीग्रॅम कोकेन कि रु ५,१६,०००/ एम.डी.एम.ए च्या १२ पिल्स वजन ५ ग्रॅम ५ मिलीग्रॅम कि रु १,१०,०००/ कैथा इडुलिस खत १ किलो २७५ ग्रॅम कि रु.१,०२,०००/- एम डी १८ ग्रॅम ०९ मिलीग्रॅम कि रु ३,७८,०००/-, है अंमली पदार्थ तसेच दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, दुचाकी गाडी, तीन मोबाईल फोन, एक काळया रंगाची पर्स, एक कॅमरुन देशाचा पासपोर्ट असा एकुण ११,८८,५००/- रु अमली पदार्थ व ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आले म्हणुन त्या दोघांचे विरुध्द लोणीकाळभोर पो स्टे गु र नं ५७९ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २२ ( ब ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याबाबत पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर यांनी लोणीकाळभोर पो स्टे येथे फिर्याद दिली आहे..
नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शना खाली अंमलीपदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, श्रीमती अश्विनी सातपुते, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण बेंगळे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित पाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे संदेश काकडे, विशाल शिंदे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.