देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वानाडोंगरी:- स्वर्गीय संदीप कोहाड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल महाजनवाडी, वानाडोंगरी येथे तान्हा पोळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्य कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापक धर्मेंद्र कोहाड , शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या हलमारे, प्रीती कोहाड, प्रा. मनोज फळणीकर उपस्थित होते.
सर्वप्रथम लहान मुलांनी सजवून आणलेल्या नंदीची पूजा करण्यात आली व शेतकरी नृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्रीयन वेशभूषेत तयार होऊन आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. शिक्षीका प्रीती कोहाड यांनी शेती व शेतकरी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. तसेच मुख्याध्यापिका विद्या हलमारे यांनी शेतकरी राजा व त्याच्या साथीला वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजा विषयी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले.
यावेळी लहान बालकांमध्ये उत्साह संचारला होता व पालकांनीसुद्धा मुलांच्या उत्साहाला भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमाचे संचालन कोमल निघोट यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348