Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विधीसंघर्षित बालकाचे अपहरण करुन खुन करणा-या ओंकार चंद्रशेखर कापरे ( टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १० सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
टोळी प्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे व त्याचे इतर ०९ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे : – दिनांक ०२/०९/२०२३ रोजी रात्री ०८/३० वा. चे सुमारास राहते घरातुन फिर्यादी यांचा मुलगा वय १६ वर्षे ६ दिवस हा कोंढवा खु मनपा शाळेमागे ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला तो परत घरी आला नाही म्हणुन त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. वगैरे मजकुराची तक्रार दिल्याने भा. द. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अपहृत बालक याचे विषयी विधीसंघर्षित बालक वय १६ वर्षे रा. कोंढवा खुा पुणे वाचे कडे केलेल्या तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले आहे की त्याला व दाखल गुन्हयातील अपहृत मुलगा यांस दिनांक ०३/०९/२०२३ इसम नामे साईराज उर्फ साया लोणकर, ओंकार कापरे उर्फ आप्पा, रोहन गवळी, पप्पु उर्फ महादेव गजाकोष, राज ठोंबरे, कृष्णा जोगदंड, सौरभ तायडे उर्फ दत्ता, प्रणय सुनिल पवार, अमन व दोन विधीसर्पित बालक यांनी निल खवळे यांस आमची टिप देतो या कारणावरुन कोंढवा येथुन चारचाकी गाडीत बसवुन, मंतरवाडीचे आसपास अपहृत मुलगा यास झाडाच्या फांदयानी मारहाण केली. त्यानंतर सासवड येथील दिवेघाटाचे नजीकचे टेकडीचे जवळील रुममध्ये नेवुन त्यास फावडयाचे लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारले आहे. तसेच साक्षीदार यास देखील लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले आहे. त्याबाबत साक्षीदार याचा सविस्तर जबाब घेण्यात आलेला असुन त्यानुसार दाखल गुन्हयात भा.दं.वि कलम ३०२,३६४,१२० (ब), २०१,३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ ५०६ मपोका १४२ अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे म्हणून दिले फिर्यादी वरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं.८९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३६३ कलमवाढ ३०२,३६४, १२० (ब), २०१,३२६. १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, मपोकाक १४२ हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) ओंकार चंद्रशेखर कापरे वय २७ वर्ष रा. अलका निवास, संत गाडगेमहाराज, शाळेसमोर, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी प्रमुख) २) साईराज राणाप्रताप लोणकर वय २३ वर्षे रा होलेवस्ती चौक उंड्री पुणे व कोंढवा खुर्द पुणे (टोळी सदस्य ) ३) प्रणय सुनिल पवार वय १९ वर्षे रा.तानाजी लोणकर यांचे ऑफीस मागे, कोंढवा पुणे (टोळी सदस्य ) ४) सौरभ उर्फ दत्ता माणिक तायडे वय १८ वर्षे रा. मारुती अळी, बाबर चौक, कोंढवा खुा पुणे (टोळी सदस्य) ५) कृष्णा प्रकाश जोगदंडे वय २० वर्षे रा. कमलदिप पार्क, कुलपीत अपार्टमेंट बाजुला मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी सदस्य) ६) महादेव उर्फ पप्पु गोविंद गजाकोष वय १९ वर्षे रा. शिवनेरीनगर लेन न.६, कोंढवा खुा पुणे (टोळी सदस्य) ७) रोहन अनिल गवळी वय २१ वर्षे रा. ग.नं. २७ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे ( टोळी सदस्य) ८) राज ठोंबरे रा. ग.नं. २३ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे (टोळी सदस्य) ( पाहिजे आरोपी ) ९) अमन पुर्ण नाव पत्ता नाही (पाहिजे आरोपी) १०) दोन (विधीसंघर्षित बालक) यातील दाखल गुन्हयात अ.क्र. १ ते ७ यांना अटक करण्यात आलेली असुन दोन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. व अ.क्र.८ व ९ हे पाहिजे आरोपी आहेत.

नमुद आरोपी टोळी प्रमुख १) ओंकार चंद्रशेखर कापरे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारासह संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून किंवा हमला करण्याची धमकी देवून किंवा हमला करण्याची पुर्वतयारी करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे खुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे पोलीसांचे आदेशाचा भंग करणे नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, चोरी यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर पुणे शहरातील कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे विविध गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत..

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३(१) (i). ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष सोनवणे यांनी मा.सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराजे साळवे. मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५, पुणे श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस स्टे.गु.रजि नं.८९६/२०२३ भा.दं.वि. कलम ३६३कलम वाढ ३०२,३६४,१२० (ब), २०१,३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ म.पो.का.क. १४२ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (i). ३ (२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता
दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री शाहुराजे साळवे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परि ५. श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पो. आयुक्त, वानवडी विभाग श्री. शाहुराजे साळवे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पो स्टे श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री संदीप भोसले, श्री. संजय मोगले, पोलीस उप निरीक्षक श्री. समाधान मचाले पोलीस अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर, गणेश आगम, शिवलाल शिंदे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंगलदार यांना निर्देश देण्यात आले • आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ६२ वी कारवाई आहे.

Previous Post

हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?

Next Post

नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In