संदीप सुरडकर,नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- हॉटेल प्राईड मधील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना एका व्यापाऱ्याचा जुलै महिन्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात सोनेगाव पोलीस ठाण्यात महाव्यवस्थापक का सह चार लोकान विरोधात गुन्हा दखल करण्यात आला.
हॉटेल प्राईडच्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या स्विमिंग ट्रेनरकडे प्रमाणपत्र नसताना देखील त्याची नियुक्ती करण्यात आली होती व येथे सुरक्षेचे उपकरणे देखील नव्हती. सुशांत मधुसूदन धोपटे वय ५१, मेघरे लेआउट, मनीष नगर असे मृत्यूचे नाव आहे. ते मुलगा शौर्य वय १२ वर्ष व मुलगी शगुन वय १७ वर्ष त्यांच्यासह दोन महिन्यापासून हॉटेल प्राईड येथील स्विमिंग टॅंक मध्ये पोहण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे ते ४ जुलै रोजी सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास पोव्हायला गेले. ते नेहमीप्रमाणे सकाळी 9.00 वाजता स्विमिंग क्लास संपल्या नंतर प्रशिक्षकाने निघण्याची इच्छा व्यक्त केली व तो कपडे बदलवायला गेला. त्यावेळी धोपटे, त्यांची मुलगी शगुन आणि एक डॉक्टर टँक मध्येच होते. टॅंकच्या एका टोकाला शगुन आणि डॉक्टर पोहायला लागले तर धोपटे दुसऱ्या टोकाला पोहायला लागले. दरम्यान पोहोत असताना धोपटे यांना चक्कर आली व ते पाण्यात बुडाले. दुसऱ्या टोकाला असल्याने शगुन आणि डॉक्टराणा त्यांची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान प्रशिक्षण कपडे बदलून परतल्यावर धोपटे दिसत नसल्या मुळे त्यांनी शगुन ला विचारले. शगुण ने हाताचा इशारा करत आम्ही इथे पोहतो होतो असे सांगितले.
त्यामुळे प्रशिक्षक शिक्षकांनें टॅंक मध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र चौकीदारी दरम्यान धोपटे यांनी स्विमिंगसाठी मेंबरशिप घेतल्याचे दिसून आले. पूल मध्ये जाणाऱ्या मेंबर्स साठी प्रशिक्षक व जीवन रक्षक असणे आवश्यक असते. तसेच प्रशिक्षकाकडे अधिकृत प्रमाणपत्र गरजेचे असते. मात्र अक्षय मधुकर राव चतुरकर वय २८ वर्ष त्याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. तरी देखील त्याला प्राइड हॉटेलचे महाव्यवस्थापक सुजित कुमार सिंग, एच आर व्यवस्थापक अमोल सदाशिवराव कोकाटे वय ३९ वर्ष व अनुराग राजेंद्र गुजर वय ३३ वर्ष यांनी कामावर ठेवले. तसेच स्विमिंग पूल जवळ जी वाचवण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे देखील ठेवली नव्हती. चारही आरोपीच्या निष्काळजीपणा मुळे धोपटे यांचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

