संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- शहरात दिवसाने दिवस तरुणाई ड्रग्सच्या जाळात फसत आहे. त्यात तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे व्यसन करत आहे. त्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचा वचक कमी झाल्यामुळे शहरात ड्रग्स तस्करांच्या टोळ्या दिवसान दिवस वाढत आहे. गुन्हे शाखा कर्तव्य बजावण्यात कसून ठेवत असल्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांना छापे घालून ड्रग्स तस्करांना अटक करावी लागत आहे.
यात यशोधरा नगर पोलिसांनी छापा घालून दोन ड्रग्स तस्करांना अटक करून तीन लाख रुपयाची एमडी ड्रग्स जप्त केली. हे एका पब मध्ये तरुणींना ड्रग्स पुरवत होते. शोएब खान जबर खान वय 19 वर्ष, विनोबा भावे नगर आणि सलीम शहा आयुब शहा निजामुद्दीन कॉलनी अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहेत. तिसरा ड्रग्स तस्कर समीर खान समशेर खान राजीव गांधी नगर झोपडपट्टी हा फरार झाला आहे.
यशोधराचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या पथकाला रविवारी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास विनोबा नगराच्या प्रवेश द्वारासमोर तीन युवक संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी घेराव घालून शोएब खान आणि सलीम शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर समीर खान अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला. आरोपीकडून २७ ग्राम एमडी किंमत२.७८लाख जप्त केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

