🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन समुद्रपुर:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ए.पी.एस.एस आदर्श बायो. ॲग्रो. प्रा.लि. लसणपुर कंपनीमध्ये सुपरव्हायझर यांनी समुद्रपुर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली की, सदर कंपनीमध्ये सिएनजी गॅसची निर्मीती होत असते. कंपनीमध्ये पाण्याच्या पुरवठ्याकरीता विहीर असुन, त्या विहीरीमध्ये असलेले 5 एचपी व 3 एचपी चे दोन सबमर्सिबल मोटर पंप केबल वायरसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे रिपोर्टवरून समुद्रपूर पोलीस स्येटेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात डि.बी पथक समुद्रपूर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आरोपी व मुद्देमालाचा शोध घेत असतांना, मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे, विनोद गोमाजी मसराम, वय 39 वर्ष, रा. पाईकमारी, तह. समुद्रपूर, 2) जितेंद्र मोतीराम भोयर, वय 40 वर्ष, रा. पाईकमारी, तह. समुद्रपूर या आरोपीतांना त्यांचे राहते घरी जावून गुन्ह्यासंदर्भाने विचारपूस केली असता, ते उडवा-उडवीचे उत्तरे देत असून, त्यांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने, त्यांचे राहते घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, सदर गुन्ह्यातील वरील नमुद वर्णनाचा चोरीस गेलेला मुद्देमाल व चोरीच्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली मोटर सायकल असा जु.किं. 1,23,300 रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने, तो जप्त करण्यात आला. आरोपींनी यापुर्वी चोरी केलेली मोटर पंप व स्प्रिक्लर बाबत पो.स्टे. समुद्रपूर येथे अप क्र. 398/23 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा नोंद असल्याने, दोन्ही आरोपीतांचा दि. 20 सप्टेंबर पर्यंत पिसीआर घेण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.