पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हिंजवडी पोलीस स्टेशनचे हददीत दि१२/०९/२०२३ रोजी सकाळी ताथवडे येथील व्यावसायीकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर, नं.१०६६/२०२३ भा.द.वि. कलम ३६४ (अ).३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अप मुलाची सुटका करण्यासाठी अपहरण कर्त्यांनी ३० लाख रूपयाची मागणी केली होती व पैसे न दिल्यास मुलाचे हात-पाय तोडण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान अपहरण झाल्याची माहीती प्राप्त होताच, हिंजवडी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड व सासवड पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून अपहृत मुलाचा शोध घेवून अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली होती तसेच आरोपी नामे १) तेजस ज्ञानोबा लोखंडे वय २१ वर्षे रा. दत्तमंदीर शेजारी मारुजी पुणे २) अर्जुन सुरेश राठोड वय १९ वर्षे रा. दत्तमंदीर शेजारी मारुजी पुणे ३) विकास संजय म्हस्के वय २२ वर्षे रा. शिवारवस्ती भुमकरचौक हिंजवडी पुणे यांना अटक करण्यात आली होती व त्यांचकडुन एक चारचाकी गाडी, लोखंडी पालघन, छत्ऱ्याची पिस्तोल, ३ मोबाईल फोन व हातोडा, छिन्नी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास श्री महेंद्र गाढवे, पोलीस उप-निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांचकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्हयातील अटक आरोपी यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांना हॉटेल व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने मुलाचे अपहरण केले असे सांगितले तसेच गुन्हयात वापरलेल्या मोबाईलच्या तांत्रीक विश्लेषणाव्दारे सदर गुन्हयामध्ये इसम नामे रेहान रियाजुद्दीन सय्यद वय-२८ वर्षे, धंदा-रिज व्यवसाय, रा. भोंडवे वस्ती सुदर्शन कॉलनी वाल्हेकरवाडी रावेत पुणे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी रेहान रियाजुददीन सय्यद याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याचे रेहान मोटर्स नावाचे गॅरेज ताथवडे पुणे येथे असुन तो त्याचे गॅरेजमधील भंगार मटेरीयल हे अपहृत मुलाचे वडीलाचे दुकानात विक्रीसाठी घेवुन जात होता व तो तेथे पैसे आणण्यासाठी त्याचे सोबत त्याचा मित्र विकास संजय मस्के असे गेले असता आरोपी विकास मस्के याचे मनात भंगारवाल्याकडे खुप पैसे असण्याची शक्यता आहे व त्यामुळे त्याचे मुलाचे अपहरण केल्यास मोठया प्रमाणात पैसे मिळु शकतात अशी त्यांची खात्री झाल्याने आरोपीतांनी त्याचे अपहरण करण्याबाबत कटआखला होता असे त्याने सांगीतले.
कटाचा मुख्य सुत्रधार रेहान सय्यद आणि विकास मस्के: आरोपी रेहान सय्यद याचे परिचयाचा अपहृत मुलाचे वडील असल्यामुळे तो पुढे न येता पडदयापाठी मागे राहुन आरोपींना मदत करत होता तसेच त्यांनी कट आखल्यानंतर आरोपी तेजस लोखंडे याचेकडे असलेली मारूती सुझुकी कंपनीची झेन ही चारचाकी गाडी क्र. एम. एच. १४ ए.ई ०९१८ या गाडीचा रंग बदलून घेतला तसेच ब्लॅक फिल्मींग करून घेतली तसेच आरोपी रेहान सय्यद याचे गॅरेजवर दुरूस्तीसाठी आलेली हॉडा सिटी गाडी नं. एम. एच. १४ ई. यु.७७६३ अशा दोन चारचाकी गाड्यांचा वापर केला असुन आरोपी यांनी दि.१२/०९/२०२३ रोजी मारुती सुझुकी झेन गाडीतून मुलाचे अपहरण केले तर होंडा सिटी गाडीमध्ये पसुन आरोपी रेहान सय्यद हा पाठीमागुन स्वत्तः येत होता तसेच तसेच अपहरण कर्त्यांनी मागितलेली खंडणीची रक्कम स्विकारण्यासाठी सदर गाडीचा वापर करणार होता.
अपहरण कर्ते व मास्टरमाइंड यांनी अपहरणाचा कट रचला व त्या कटाअंतर्गत आपापसात संपर्क ठेवण्यासाठी चोरीचे मोबाईल वापरावयाचे ठरवले व त्यासाठी आरोपी विकास मस्के व तेजस लोखंडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून उत्तरप्रदेश, बिहार येथुन आलेले मजुरांच्या तीन मोबाईलची चोरी केली. तसेच छत्र्याची पिस्तोल व लोखंडी कोयता हा आरोपी विकास मस्के याने उपलब्ध केले होते.. आरोपी यांनी मुलाचे अपहरण करण्या अगोदर व्यावसायीकांचा मुलगा कोठे जातो. त्याचेकडे किती पैसा असेल व त्याचे कोठुन अपहरण करता येईल याबाबत रेकी केली तसेच आरोपी यांनी दि.१०/०९/२०२३ रोजी मुलावर पाळत ठेवुन त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलगा राहते घरातून बाहेर न आल्याने त्यांना अपहरण करता आले नाही. त्यानंतर दि. १२/०९/२०२३ रोजी पुन्हा आरोपी यांनी पाळत ठेवली व मुलाचे अपहरण केले. सदर मुलाचे अपहरण केल्यानंतर पैसे न दिल्यास मुलाला मरीयाई घाट सासवड येथे देवुन जावुन पुढील निर्णय घ्याचा असे आरोपी यांनी ठरवले होते. दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्री. महेंद्र गाढवे, पोलीस उपनिरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चोर सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड म. शिंदे सो सहपोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सी. अप्पर पोलीस आयुक्त मा. काकासाहेब डोळे सी पोलीस उपायुक्त परिन् पि.चि. शहर, मा. विशाल हिरे सी. सहा पोलीस आयुक्त, पाक विभाग पि.चि. मा. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिवडी पोलीस स्टेशन, मा. सुनिल पोलीस निरीक्षक(भावान), मा. सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक(गुन्हे) यांचे मार्गदर्शना पोलीस उपनिरीक्षक पीया ७३२ प्रमोद उसले पोहा १०२४ जायनाथ, पो.ना. १७४६ शिवाजी मोपे पो.शि.२१३९ इनकासिंह गुमलाडू , पो.शि.२२८२ उमेश पी. शि. १९२८ सागर पंडीत यांनी केली.