युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील खरीप हंगामाच्या सुरवातीला पावसाने दडी मारल्यामुळे व आता होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच येल्लो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा देखील सोयाबीनवर प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे ठिय्या आंदोलन केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यात माजी मंत्री रमेश बंग, जिल्हाध्यक्ष राजूजी राऊत, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, अर्चनाताई हरडे, सभापती बालुभाऊ जोध, दिनेश बंग, प्रेम झाडे, उज्वला बोढारे, रमेश फुले, प्रकाश नागपुरे , लीलाधर धनविजय, अमर जैन ,विनोद हरडे, साबीर मिर्झा, पुरांदास तांदेकर, अनिल ठाकरे, रश्मीताई आरघोडे, विलास कांबळे, नौशाद सिदिकी, अशोक गोंगल, नझिम बेघ, उदयसिंग यादव, संजय चिकटे, वसंतराव इखनकर, अमिता ठाकरे, युवराज मेश्राम, विशाल गाडबैल ,मनोहर वानखेडे, राजेश ठवकर, श्रीराम भिवगडे, मुकेश बोरकर, आनंदराव अंभोरे, दिनकर इंगोले, किशोर बेले, दिलीप गोवरदिपे, अश्विन झोडापे , पद्माकर बावणे, दिनेश्वरजी राऊत , नरेश चौकसे , सोनम श्रावणकर, पंजाब राव इंगोले , राजू खांदे ,प्रमोद रेवतकर , निजामुद्दीनजी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

