अर्पित वाहणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला काँलनी, वर्धा रोड येथे दिनांक 30 सप्टेंबर 2023 ला दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत समता सैनिक दल द्वारा आयोजित स्मृतीशेष मार्शल अँड. विमलसूर्य चिमणकर सर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मार्शल अभय कुंभारे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कारा प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्शल प्रकाश दार्शनिक (राष्ट्रीय बौद्धिक प्रमुखसमता सैनिक दल) प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, आंबेडकरी चिंतक, देवेश चौधरी, संपादक तिसरा पक्ष जबलपूर म.प्र, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, सेवानिवृत्त, मुख्य संयोजक-विहार, स्तुप चैत्य एवं लेनी संवर्धन विंग.स.सै.दल, इजि.अरविंद मेश्राम, अध्यक्ष बानाई, नागपूर इजि.पद्माकर पाटील, जलसंपदा मैत्री संघ, नागपूर हे उपस्थित राहतील. विशेष उपस्थिती म्हणून सुधाकर सोमकुंवर, प्रकाशक, समता संगर प्रकाशन, या कार्यक्रमाचे संचालन अशोक जांभुळकर स.सै.दल नागपूर, प्रास्ताविक-दिलीप तायडे सदस्य थिंक टँक विदर्भ प्रदेश, मार्शल ओमप्रकाश मेंढे, महाराष्ट्र प्रचारक स.सै.दल नागपूर हे राहतील.
या प्रसंगी “दुसरे महायुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर”या पुस्तकाच्या तिसऱ्या मराठी संस्करणाचे विमोचन करण्यात येणार आहे. “दुसरे महायुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका” या विषयावर उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करतील. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन समता सैनिक दल शाखा वर्धाच्या वतीने करण्यात येत आहे.

